चेंबूरच्या घाटलेतील आनंदनगरात २२ वर्षाच्या वॉर्डबॉयवर चाकूहल्ला


२२ वर्षाच्या वॉर्डबॉयवर चाकूहल्ला



मुंबई - चेंबूरमधील घाटले गाव परिसरातील आनंदनगरात भरदुपारी एका २२ वर्षांच्या वॉर्डबॉय असलेल्या तरुणावर शिवीगाळ करत चाकूहल्ला केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली.  याप्रकरणी चाकूहल्ला करणाऱ्यास गोवंडी पोलिसांनी अटक करून रीतसर गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव विशाल गायकवाड असे असून त्याच्या चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव राहुल आक्षे असे आहे.

राहुल हा आनंदनगर येथील साईबाबा चाळ येथे त्याच्या मामाकडे राहतो .तर त्याच परिसरात राहणारा विशाल गायकवाड यांचे राहुलशी दोन वर्षांपूर्वी  किरकोळ कारणावरुन भांडण झाले.

तेव्हापासून विशाल हा राहुलशी चिडून होता.राहुल हा चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील एका कोविड सेंटरमध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करतो.राहुल हा दोन दिवसांपूर्वी याच परिसरातील एका बँकेच्या एटीएमजवळ उभा असताना विशाल तेथे आला आणि त्याने राहुलशी क्षुल्लक कारण पुढे करत हुज्जत घालायला सुरुवात केली.यातून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर विशालच्या कुटुंबातील दोघेजण तिथे आले. त्यामुळे विशालला आणखीनच स्फुरण चढले आणि त्यांनी राहूलला मारहाण करायला सुरुवात केली.यावेळी विशालने खिशातून चाकू काढून राहुलच्या बरगडीजवळ दोनवेळा खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.मात्र

आजूबाजूचे नागरिक आणि राहुलचे नातेवाईक तेथे आले.त्यांनीच राहुलची मारहाणीतून कशीबशी सुटका करून प्रथम तत्काळ स्थानिक दवाखान्यात दाखल केले .मात्र रक्तस्राव जास्त होत असल्याने त्याला शताब्दी आणि नंतर सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गोवंडी पोलिसांनी याप्रकरणी विशालसह तिघांवर गुन्हा दाखल केला असून विशालला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या