जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त काहीसे...!!




प्रतिनिधी : प्रविण बेटकर

मोबा.- ९५९४४०१९२२

डोंबिवली (ठाणे)

मासिक पाळी संदर्भात असणारा दृष्टिकोन....

मासिक पाळी ही स्त्रियांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे स्त्रिला मातृत्वाचा अनुभव घेता येतो. मात्र आपल्याकडे याबाबत पूर्वीपासून अनेक गैरसमज पसरले आहेत.

मासिक पाळी हा चार चौघात न बोलण्याचा विषय आहे असे अनेकांना वाटते. त्यामुळे मासिक पाळी विषयी खुलेआम चर्चा होत नाही. 

मेडिकलमध्ये सॅनिटरी नॅपकिनही दबक्या आवाजात मागितलं जातं. मेडिकलमध्ये काम करणारे कर्मचारीही अगदी सोनं दिल्याप्रमाणे ते अगदी कागदात गुंडाळून देतात. कशाला हवी एवढी लपवा-छपवी..!

मासिक पाळी ही स्त्रियांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे प्रत्येक स्त्री परिपूर्ण होते. मात्र शहरात तसेच खेडेगावात मासिक पाळीबाबत अनेक गैरसमज पसरवले जातात. सामाजिक स्तरावर हे गैरसमज दूर करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले जातात. मात्र या प्रयत्नांना शक्य तितकं यश आलेलं नाही. 


म्हणून मासिक पाळी बाबत असलेला माझा दृष्टिकोण..!!

मासिक पाळी हा विटाळ नाही, ते तर या सृष्टीचे प्रवेशद्वार आहे. कोणत्याही झाडाला फळ येण्याआधी फुल येतं, ते बहरतं, अगदी तसंच मासिक पाळी ही देखील स्त्रियांच्या शरीराची एक नैसर्गिक क्रिया आहे.

त्याचा विटाळ होतो, त्याने देव बाटतो, त्याने घर, जागा अपवित्र होते. पण हे ठरवणारा अल्प बुद्धीचा मानव देखिल त्याच मासिकपाळीच्या गडद्द मिश्रणात तयार झाला आहे आणि ह्या जगात विज्ञानाचा आधार घेऊन अनेक चांगल्या आणि चमत्कारिक गोष्टी घडवणारा तल्लख बुद्धीचा मानव देखील त्याच गडद्द मिश्रणात तयार झाला आहे आणि तेच गडद्द मिश्रण मासिक पाळीच्या वेळी ज्या योनी मार्गातून बाहेर येते त्यातूनच त्याच्या जन्माच अंकुर फुटलेल आहे. त्याच वेदना तेव्हाही त्या योनी मार्गाच्या दातीला मानवाच्या जन्मदातीला झाल्या आहेत.

मग मासिक पाळीच्या वेळी येणार ते रक्त, ते पाणी ,ते गडद्द मिश्रण बाहेर टाकणारी आणि त्या पासून होणाऱ्या वेदना झेलणारी स्त्री किंवा तिची मासिक पाळी अपवित्र कशी..??

एकविसाव शतक चालू आहे निदान आतातरी, आपले विचार बदला जग बदलेल..!!


✍️

पत्रकार प्रविण एन. बेटकर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या