कचरा अधिभारातून नागरिकांना लुबाडण्याचे काम पालिकेवर भाजपच्या माजी नगरसेवकाचा आरोप

 कचरा अधिभारातून नागरिकांना लुबाडण्याचे काम पालिकेवर भाजपच्या माजी नगरसेवकाचा आरोप



डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली महापालिकेने कचरा संकलन अधिभार लागू केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश आहे.पालिका प्रशासन नागरिकांना सोयी सुविधा देण्याऐवजी लुबाडण्याचे काम करीत आहे.हा अधिभार चुकीचा  असल्याचा आरोप डोंबिवलीतील भाजपचे  माजी नगरसेवक विश्वदिप पवार यांनी केला आहे.

  आजही डोंबिवली येथे ठिकठिकाणी कचरा साठलेला दिसतो.कचरा व्यवस्थापना बाबत शास्त्रोक्त पध्दतीचा अवलंब केला जात नाही.घनकचरा विभागात मनुष्यबळाचा अभाव आहे.प्रत्यक्ष जागेवर काम करण्याऐवजी वातानुकुलीत केबीन मध्ये बसून निर्णय घेतले जातात, आणि फेसबुकवर बाईट दिली जाते.करोनामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती बेताची आहे.अश्यावेळी कर लागू करणे चुकीचे आहे.नागरिकांना सोयीसुविधा देण्याऐवजी त्रास देण्याचे आणि लुबाडण्याचे काम  पालिका करीत आहे. या करा विरोधात  नागरिकांच्या तक्रारी येत आहे. भारतीय जनता पार्टी या कराचा निषेध करीत आहे.या करा विरोधात आमदार रवींद्र चव्हाण यांनी पालिका आयुक्तांना जाब विचारला असून डोंबिवलीकर नागरिक   त्यांच्या पाठीशी उभे आहेत असे विश्वदिप पवार यांनी  सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या