बालाजी गार्डन स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न
डोंबिवली (प्रतिनिधी) :
डोंबिवली पूर्वेतील नंदिवली टेकडी परिसरातील बालाजी गार्डन कॉम्प्लेक्स मध्ये 'आपली सोसायटी आपली जबाबदारी' मोहिमेअंतर्गत बालाजी गार्डन मित्र मंडळाने रविवार ३० मे रोजी स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते. या अभियानाला रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या अभियानात कॉम्प्लेक्स मधील आवारातील गटार, कचरा, माती आदी प्रकारची साफसफाई करण्यात आली. या अभियानात तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत रहिवाशांनी भाग घेतला आणि उपक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावला. तसेच बिल्डिंगच्या आवारात, लॉबी, लिफ्टमध्ये स्वच्छतेबाबत पोस्टर लावून कचरा हा कचरा डब्यातच टाकावा, परिसरात किंवा परिसराच्या आवारात टाकू नये अशी जनजागृतीही केली.
कोरोना महामारीचे संकट असताना स्वच्छता राखणे ही काळाची गरज आहे. आपणही आपली सोसायटी स्वच्छ आणि सुंदर करून आपल्या कुटुंबाला रोगराईपासून दूर ठेवू असा येथील रहिवाशांचा मानस आहे. पुढील काळात असेच अनेक सामाजिक उपक्रम राबवू असे बालाजी गार्डन मित्र मंडळाने सांगितले. हा उपक्रम मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डीस्टनचे पालन करून राबविण्यात आला.
0 टिप्पण्या