रहिवाश्यांना घन कचरा व्यवस्थापन कर लागू करू नये

 


    शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रेंचे स्पष्ट मत


डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना काळात लॉकडून सुरु असल्याने सामान्य नागरिकांची आर्थिक कंबरडे मोडले असताना पालिका आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापन कर लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत शिवसेनेचे स्थायी समितीचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी पालिका प्रशासनाने रहिवाश्यांना घन कचरा व्यवस्थापन कर लागू करू नये असे स्पष्ट मत मांडले आहे. शिवसेना नेहमीच नागरिकांच्या पाठीशी उभी असल्याने या कराबाबत पालिका आयुक्तांनी पुनर्विचार करावा असेही म्हात्रे म्हणाले.


 

 राज्य सरकारने केडीएमसीच्या महासभेत या कराबाबत महासभेत फक्त माहितीसाठी पाठीवला होता.त्यामुळे हा कर पालिका हद्दीत लागू करावा कि नाही यासाठी लोकप्रतिनिधींच्या मंजुरीचा प्रश्नच येत नाही असे शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे  म्हणाले. ते पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात हा कर लागू करण्याचा ठराव आला होता एकदा का राज्यसरकारने कराबाबत शिक्कामोर्तब केली कि प्रशासनाला त्यावर पाउले उचलावीच लागतात.आताच्या कोरोना काळात लॉकडाऊन सुरु असल्याने जनतेचा विचार करून पालिका आयुक्तांनी या कराबाबत पुनर्विचार करून रहिवाश्यांना हा कर कोरोना महामारी संपेपर्यत लागू करू नये. शिवसेना जनसामान्यांच्या पाठीशी असते.सध्या करोना काळात जनता आर्थिक विवंचनेत आहे.महापालिकेने लागू केलेला कर आणि वसूली रास्त नाही.हि बाब आम्ही मान्य करतो.सरसकट शहरातील प्रत्येक घरांवर एकच कर लावण्या ऐवजी वेगवेगळी कर रचना असावी.इमारती, चाळी,  झोपडपट्टी यांना एकच कर लावू नये.श्रेणीनुसार वर्गवारी करावी.शहरातील आस्थापनांना प्रथम कर लागू करावा.त्यानंतर टप्याटप्याने इतरत्र कर प्रणाली लागू करणे उचित ठरेल.कोरोनाच्या आपतीकाळात आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी उतम प्रशासक असल्याचे दाखवून दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या