सचिन वाझे, परमबीर सिंग छोटी माणसं, त्यांच्या मागचे हात शोधा, देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत मागणी
नवी दिल्ली : सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी केल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर अजून एक गंभीर आरोप केलाय. सचिन वाझे किंवा परमवीर सिंग हि छोटी माणसं आहेत. त्यांच्या मागचे हात शोधा, अशी मागणी फडणवीस यांनी राजधानी दिल्लीत केलीय. तसच मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही NIAने आपल्याकडे वर्ग करुन घेण्याची मागणी फडणवीसांनी केली आहे
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
‘ही केस सीआययूकडे येण्याचं कारण नव्हतं. बादशाह रॅपर, रितीक रोशन केस असो, सर्व हायप्रोफाईल केसेस सीआययूकडेच जात होत्या. सीपीनंतर कोणाचा वट किंवा कद होता तो सचिन वाझेंचा होता. मुख्यमंत्र्यांच्या जवळ, गृहमंत्र्यांच्या जवळ, किंवा शिवसेना नेत्यांच्या जवळ दिसत. सचिन वाझे यांना वसुली अधिकाऱ्याच्या रुपात बसवण्यात आलं. मुंबईत डान्सबार सुरु ठेवण्यात सूट, आणि सर्वाचे इन्चार्ज सचिन वाझे होते”, असा गंभीर आरोप फडणवीसांनी पत्रकार परिषदेत केला आहे.


0 टिप्पण्या