दैवत उद्योग समूहाच्या वतीने कानडगाव शाळेच्या विकास कामासाठी.एक लाख रुपये निधी
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील प्रसिद्ध दूध उद्योजक नेहमी गरिबांच्या सुख दुःखाला आपले समजून मदत करणारे केशव शिंदे यांनी कोरोना काळामध्ये राहुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये भाजीपाला किराणा वाटप करून गरिबांच्या चुली पेटवल्या राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा संत ज्ञानेश्वर विद्यालय त्रिंबक पूर शाळा कोणतेही शाळा असो केशव शिंदे नेहमी खारीचा वाटा उचलत असतात आत्ताच केशव शिंदे यांच्या कानावर आले होते की डॉक्टर बाबुराव बापुजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेचे कानडगाव येथील प्रगती माध्यमिक विद्यालय इमारत दुरुस्ती करण करणे होते व विद्यार्थी उपयोगी वस्तूंची गरज होती केशव शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न करता माजी खासदार बापूसाहेब तनपुरे यांची भेट घेऊन एक लाख रुपयाचा विकास निधी दैवत उद्योग समूहाच्या वतीने माजी खासदार बापूसाहेब तनपुरे यांच्याकडे सुपूर्त केला यांच्या मदतकार्यामुळे कानडगाव येथील नागरिकांनी केशव शिंदे यांचे.आभार.मानले राहुरी तालुक्यात केशव शिंदे यांच्या कार्याची सगळीकडे कौतुक होत आहे.


0 टिप्पण्या