'गर्भांकुर 'काव्यसंग्रहाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा

 'गर्भांकुर 'काव्यसंग्रहाचा  दिमाखदार प्रकाशन सोहळा 


 गर्भांकुर म्हणजे सकस विचारांची पेरणी आणि भविष्याचा तेजोमय अंकुर

 जिल्हाधिकारी मा.सुरजजी मांढरे

माणसाच्या कर्तृत्वाची बीजारोपण ही त्याच्या बालपणापासून होत असते त्याच प्रमाणे सात्विक विचार,तेजस्वी कर्तृत्व ,आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व घडायचे असेल तर त्याला अंकुरण्या आधीपासूनच सकस ज्ञानाचा खत पुरवठा ,संस्काराचे जल शिंपण,मायेचा आधार,  आणि कर्तृत्वाची झालर मिळायलाच हवी तेव्हाच भविष्यातील तेजोमय अंकुर फुटेल .माणसाची विविध रूप ही वरील  प्रणालीतच दडलेली आहे.अशोक कुमावत यांच्या गर्भांकुर या काव्यसंग्रहात हीच विविधांगी शक्तीरुप वास्तव रूपाने मांडली आहेत असे प्रतिपादन या कवितासंग्रह प्रकाशन प्रसंगी मा.जिल्हाधिकारी  सुरजजी मांढरे यांनी केले.

 महाराष्ट्रभर रोज आपली प्रेरणादायी लेखमाला पोहोचविणारे,उठा तुम्हीही जिंकणारच या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक,कवी,वक्ता राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अशोक कुमावत  यांचा वैशाली प्रकाशन पुणे  यांनी गर्भांकुर हा कवितासंग्रह आज प्रकाशित करण्यात आला.

        कोविड  नियमांचे पालन करत सदरचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाला. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी नितीनजी मुंडावरे,मिसेस इंडिया इंटरनॅशनल शिल्पी अवस्थी,नासिक सायकॅलिस्टचे अध्यक्ष राजेंद्रजी वानखेडे,प्रसिध्द साहित्यिक ,सूत्रसंचालक रविंद्र मालुंजकर,कुमावत समाजाचे राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव कारवाळ, वैशाली प्रकाशनचे प्रकाशक विलासजी पोतदार ,प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर, कुमावत समाजाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव भवरे,राजेंद्रजी काळे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या