यशस्विनी झालेल्या महिलांचा गौरव सोहळा,कवी संमेलन
दिनांक ८ मार्च ठाणे येथे जागतिक महिला दिनी वेगवगळ्या क्षेत्रात यशस्विनी झालेल्या महिलांचा गौरव सोहळा , कवी संमेलन आणि कविता कशी जन्मास येते ,या कार्यक्रमात नक्षत्रांच देणं काव्यमंच पुणेचे राष्टिय अध्यक्ष कवी वादळकार प्रा.राजेंद्र सोनवने सर यांनी संकलन केलेल्या कविता असलेल्या, कॅलेंडरचे प्रकाशन मराठी साहित्य मंडळ मुंबईचे राष्टिय अध्यक्ष मा.जेष्ठ साहित्यिक ,लेखक कवी डाॅ.जयप्रकाश घुमटकर सर,राष्टिय ऊपाध्यक्षा कवयित्रि सौ.ललिता गंवादे मॅडम ठाणे जिल्हा अध्यक्ष मा.विनोद मुळे सर ,चिटणीस हिंगोणेकर सर यांचे ऊपस्थित करण्यात आले .
नक्षत्रांच देणं काव्यंमंचचे जेष्ठ नक्षत्र कवी साहित्यिक ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष मा. परशुराम नेहे सर अर्थात नेहे तात्या यांनी या सर्व क्रार्यक्रमाचे सुंदर आयोजन करुन आपल्या कवी नक्षत्रांच्या कवितांची बरसात कॅलेंडरच्या माध्यमातुन ठाणे नगरीवर व महाराष्टातुन आलेल्या सर्व कवी, कवयित्री , साहित्यिकावर केली आहे
0 टिप्पण्या