हुक्का पार्लर सुरू असल्यास वरिष्ठ पोलीस अधिकारी जबाबदार - गृहमंत्री अनिल देशमुख..
हुक्का पार्लर सुरू असल्यास वरिष्ठ पोलीस अधिकारी जबाबदार - गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले विधान..
प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)
राज्यात ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल, तेथील संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत सांगितले.
आमदार रवींद्र फाटक, महादेव जानकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
राज्यात ज्या ठिकाणी अंमली पदार्थाची खरेदी-विक्री होत असेल, त्या ठिकाणी दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत असे सांगून गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, ठाणे जिल्ह्य़ात अमली पदार्थविरोधी पथकाने ११ ठिकाणी छापे टाकून ४२ लोकांवर कारवाई केली आहे.
वरळी येथील पबमध्ये झालेली गर्दी व करोनाच्या नियमांचे झालेले उल्लंघन याबाबत दोन दिवसांत चौकशी करण्यात येईल व त्याचा अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.


0 टिप्पण्या