कोरोनाने त्रस्त असलेल्या महिलेचा विनयभंग; कल्याणच्या कोविड सेंटर मधील लज्जास्पद घटना..

 कोरोनाने त्रस्त असलेल्या महिलेचा विनयभंग; कल्याणच्या कोविड सेंटर मधील लज्जास्पद घटना..



प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

 

  कल्याणच्या लाल चौकी येथे दोनच दिवसांपूर्वी सुरु झालेल्या कोविड समर्पित रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर अली आहे. सदर ठिकाणी कार्यरत आलेल्या वॉर्डबॉय श्रीकांत याने हे अश्लील कृत्य केले आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने हा प्रकार उघडकीस आणला आहे तसेच त्याने स्वतः पोलिसांत जाऊन तक्रार देखील दाखल केली आहे. 


  कल्याण पश्चिमेत लाल चौकी परिसरातील आर्ट गॅलरी मध्ये हे कोविड सेंटर तयार करण्यात आले होते. मात्र रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे ते बंद पडून होते. गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा कोरोनाच्या महाभयंकर महामारी ने दुपटीने डोके वर काढल्या मुळे दोन दिवसांपूर्वी हे सेंटर पुन्हा सुरु करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या