अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील बत्ती गुल करुन मनसेने दिली मेणबत्ती भेट...आत्ता मेणबत्ती भेट दिली उद्या कार्यालया पेटून देणार- मनसेचा इशारा..
वीज तोडणी विरोधात मनसेचे अनोखे आंदोलन...
कल्याण ( शंकर जाधव) थकबाकीदारांची वीज तोडणी विरोधात कल्याणमध्ये मनसेने अनोखे आंदोलन केले. अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील वीज आणि पंखा बंद करुन मेणबत्ती गीफ्ट दिल्या. इतकेच नाही तर वीज तोडणीची कारवाई थांबिवली नाही तर कार्यालय पेटवून देऊ असा इशारा यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्यभरात वाढीव वीज बिला विरोधात मनसे आणि भाजपने आांदोलन केले. मात्र सरकार किंवा महावितरण कंपनीवर त्याचा फारसा फरक पडला नाही. कल्याण डोबिवली देखील काही नागरीकांची वीज पुरवठा खंडीत केला गेला आहे. याची माहिती मिळताच मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणो, महेंद्र कुंदे, अनंता गायकवाड, निर्मल निगडे हे पदाधिकारी कल्याण पूर्व टाटा पॉवर नाका परिसरात असलेल्या वीज वितरण कार्यालयात पोहचले. महावितरणचे कार्यकारी अभियंता नरेंद्र धबड यांच्या कार्यालयात जाऊन या पदाधिकाऱ्यांच्या केबीन मधील लाईट पंखा बंद केला. जवळपास पाऊण तास मनसे पदाधिकारी अधिकाऱ्यांना अंधारात चर्चा करीत होते. लाईट पंखा नसल्याने नागरीकांना काय त्रस होतो हे अधिकारी वर्गास दाखवून दिले. नंतर धबड यांना मेणबत्ती भेट दिली. वीज तोडणीची कारवाई थांबविण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी मनसे पदाधिकारी योगेश गव्हाणो यांचे म्हणणो वीज तोडणीची कारवाई महवितरण थांबविली पाहिजे. आज मेणबत्ती दिली आहे. उद्या मेणबत्ती पेटवून देणार तसेच कार्यालयही पेटवून देणार असा इशारा दिला.


0 टिप्पण्या