डोंबिवली पश्चिमेकडील बावनचाळीत गांजा सेवन करताना तरुणाला अटक
डोंबिवली ( शंकर जाधव ) गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना एका तरुणाला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली.हि घटना गुरुवारी ११ तारखेला रात्री साडे वाजण्याच्या सुमारास बावनचाळीतील पडक्या चाळीत घडली.विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वपोनि संजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गडणे, पोलीस हवालदार नाईकर,पोलीस नाईक सांगळे या पथकाने सदर ठिकाणी जाऊन साहिल किशोर भोईर ( १९ ) याला गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना अटक केली. आपल्याला गांजा सेवन करण्याचे व्यसन असल्याची साहिल याने पोलिसांकडे कबुली दिली.साहिल हा डोंबिवली पश्चिमेकडील गुप्ते रोडवरील गणेश स्मृतीजवळील गावदेवी सोसायटीलगत असलेल्या सर्व्हिस सेंटर मध्ये काम करतो. अटक केल्यानंतर अंमली पदार्थ कुठून आणले याची पोलिसांनी साहिलकडे चौकशी केली असता त्याचा मित्र उल्हासनगर येथून अंमली पदार्थ आणून देत होता असे सांगितले. उल्हासनगर येथे कुठल्या ठिकाणी अंमली पदार्थ विकले जातात याची शोध पोलीस कसून शोध घेत आहेत.
0 टिप्पण्या