कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या ७९ जणांवर गुन्हे

 कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या ७९ जणांवर गुन्हे


 डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या ३६ जणांवर कल्याण –डोंबिवलीतील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले  आहे. १० ते १२ असे तीन दिवस मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७९ जणांवर गुन्हे दाखल झाले आहे. १० मार्च रोजी सायंकाळी ६  ते  ११  मार्च रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत भा.द.वि. कलम १८८, २६९  व २७० सह महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२० चे नियम ११ सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम ५१ बी सह साथरोग प्रतिबंधक १८९७ चे कलम २,३,४ नुसार मास्क परिधान न करणे, सोशल डिस्टंसिंग न पाळणे अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्यामुळे महात्मा फुले पोलिस स्टेशन येथे १० ,कोळसेवाडी पोलिस स्टेशनमध्ये १, मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये ३, डोंबिवली पोलीस ठाणे येथे १४,  विष्णूनगर पोलिस स्टेशनमध्ये ८ अशा एकूण ३६  गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ( २२ डब्लू), १३१ प्रमाणे विहित वेळेत दुकाने बंद न करून नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये १५, खडकपाडा पोलिस स्टेशनमध्ये ८ अशा २३ गुन्हयांची नोंद झाली आहे. १ मार्च रोजी सायंकाळी ६  ते १२ मार्च रोजी सकाळी ६  वाजेपर्यंत आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भा.द.वि. कलम १८८, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१  प्रमाणे कोळसेवाडी पोलिस स्टेशनमध्ये ४, मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये १,विष्णू नगर पोलिस स्टेशनमध्ये १  अशा ६ गुन्हयांची नोंद झाली असून महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ( ३३ डब्लू), १३१ प्रमाणे बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये २, कोळसेवाडी पोलिस स्टेशनमध्ये १३, खडकपाडा पोलिस स्टेशनमध्ये १ अशा १६  गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या