जागतिक महिला दिनानिमित्त अलका सानप मीनाताई ठाकरे पुरस्कार.
मुंबई -बुधवार,
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रात कार्यरत नानाचौक जवळील फोर्जेट स्ट्रीट, जय हरी गृहसहकारी सोसायटीतील सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या सौ.अलका विकास सानप (सांगळे) यांना जागतिक महिला दिनानिमित्त सोमवार दिनांक आठ मार्च रोजी दामोदर हाॅल, सोशल सर्विस लिग,परळ येथे रात्री आठ वाजता कर्तृत्ववान महिला अलका सानप यांना राज्यस्तरीय सर्वोच्च पुरस्कार माँसाहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे गौरव पुरस्कार 2021 समारंभपूर्वक सन्मानित करण्यात येणार आहे.असे सुभाष डामरे मित्र मंडळाचे अध्यक्ष आनंद गावकर संस्थेच्या अधिस्विकृत पत्रात घोषित करण्यात आले आहे.(सोबत संस्थेचे पत्र)
अलका सानप सांगळे भावस्पर्शी लेखिका असून त्यांचे 'सुमन' व्यक्तचरित्र पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.त्यांना नवी दिल्लीत जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय दलित साहित्य अकादमी शासनमान्य संघटनेचा राष्ट्रीय सावित्रीबाई फुले फॅलोशिफ पुरस्कार सोमवार दिनांक 15/03/2021 नवी दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.
बातमीदार:-
दत्ताराम पुंजाजी घुगे
मोबाईल नंबर
9821793708


0 टिप्पण्या