डोंबिवलीतील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाचे पूर्वेकडच्या बाजूला उतरणाऱ्या जिन्याचे डिझाईन चुकीचे

 डोंबिवलीतील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाचे पूर्वेकडच्या बाजूला उतरणाऱ्या जिन्याचे डिझाईन चुकीचे

             करदात्या नागरिकांचे पैसे वाया

डोंबिवली  ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाचे पूर्वेकडच्या बाजूला उतरणाऱ्या जिना हा यमदूत असल्याने रेल्वे प्रशासनाने हा जिना सरळसोट बनविला कसा असे डोंबिवलीकरांना सांगत प्रशासनावर जोरदार टीका केली.या जिन्यातून उतरताना दोन नागरिक पडले असून रेल्वेच्या इंजिनीअरिग विभागाकडून तातडीने हा जिना पत्रे लावून बंद करत दुसऱ्या जिना दोन महिन्याच्या कालावधीत तयार करण्यात आला.आता बंद करण्यात आलेल्या जिना तोडण्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.करदात्या नागरिकांचा पैसे वाया गेला असून याला जबाबदार कोणअसा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. तज्ञाचा फौजफाटा असलेल्या रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे चुकीचे प्रवाशाच्या जीवावर बेतणारे काम केल्याचा प्रवाशाकडून निषेध करण्यात आला आहे.

  डोंबिवली रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूल चालताना कंपन पावत असल्यामुळे मे २०१९ पासून रहदारीसाठी पूल बंद करण्यात आल्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये पूल तोडण्यात आला. यानंतर रेल्वेकडून तातडीने पादचारी पूल उभारण्याचे काम सुरु करण्यात आले होते. मे २०२० मध्ये या पुलाचे गर्डर टाकण्यात आल्यानंतर ऑक्टोबर अखेरीस हा पूल वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला. मात्र नव्या पुलाची उंची वाढल्याने जिण्याची उंची देखील जवळपास दोन ते अडीच फुटाने वाढली. मात्र जिना उतरविण्यासाठी रस्त्यालगत जागा नसल्याने प्रशासनाकडून हा जिना २७ ऐवजी ३२ पायऱ्यांचा करण्यात आल्याने हा जिना सरळचढ असलेला बनला. अरुंद पायऱ्या आणि सरळचढण असल्याने प्रवासी या जिन्यावर धडपडत होते तर दोन ते तीन नागरीका पडून जखमी झाले. यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया रेल्वेच्या ट्वीटरवर व्यक्त केल्या होत्या. प्रवाशाच्या तक्रारीची दखल घेत रेल्वेच्या इंजिनीअरिंग विभागाने या जिण्याची पाहणी केली असता नियमापेक्षा जास्त उभा बनलेला हा जिना धोकादायक जाहीर करत या जिन्याच्या उजव्या बाजूने रेल्वेच्या जागेत नव्याने नागमोडी वळणाचा नवा जिना तयार करण्यात आला. केवळ दोन महिन्यात नव्या जिण्याचे काम पूर्ण करत रेल्वे प्रशासनाकडून जुना जिना पत्रे लावून बंद करण्यात आला आहे. नव्या जीन्याबाबत प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.चुकीच्या पद्धतीने रेखाटन करत लाखोचे नुकसान करणाऱ्या संबंधित  अधिकाऱ्यावर  कारवाई करण्याची मागणी होत आहे. याबाबत रेल्वेच्या इंजीनिअरिंग विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी अधिकृत बोलण्यास नकार देत जागेअभावी हा जिना अधिक उंचीचा मात्र सरळ चढनीचा तयार करण्यात आल्याने प्रवाशांना त्रास होत होता यामुळे त्याचा वापर बंद करत नव्याने प्रवाशासाठी सुकर जिना तयार करण्यात आल्याचे सांगितले. तर रेल्वेच्या जनसंपर्क अधिकार्यानी याबाबत संबधित विभागाशी चर्चा करून माहिती दिली जाईल असे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या