अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार..

 अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार..


                                    प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)


  एका अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्या प्रकरणी एका तरुणावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


  पीडित तरुणी अल्पवयीन असून तिच्याशी मैत्री करून तिच्या बालमनाचा फायदा घेत, एका तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला गेला असून पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. संजय राजपूत (वय 20 वर्षे), असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला तरुणाचे नाव असून तो मुलुंड परिसरात राहणारा आहे.


  नोकरीच्या ठिकाणी झाली होती ओळख

  

पीडित तरुणी डोंबिवली पूर्वेकडील कल्याण-शीळ मार्गावरील एका इमारतीमध्ये आपल्या कुटुंबासह राहते. ती २०१६ साली कल्याणमधील एका मॉलमध्ये नोकरी करीत होती. याच मॉलमध्ये तरुण ही  नोकरी करत असताना त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर ओळखीचे रूपांतर मैत्रीत होऊन त्यावेळी तिच्या बालमनाचा फायदा घेत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून एप्रिल २०१६ साली तिच्यावर मॉलच्या पार्किंगमध्ये बलात्कार केला. पीडिता या प्रकारामुळे भयभीत झाल्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. यामुळे पीडिता त्याच्या आमिषाला बळी पडली होती. त्याचाच फायदा घेत तरुणाने एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२० पर्यंत तिच्या राहत्या घरी तसेच त्याच्या राहत्या घरी तिच्यावर वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला.

  

लग्नाचा तगादा लावल्याने पीडितेला मारहाण व ठार मारण्याची धमकी

  

 पीडित तरुणीने तरुणाकडे लग्नाचा तगादा लावला असता त्याने तिला शिवीगाळ करत मारहाण करुन ठार मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर या धमकीला घाबरून तिने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तिच्यावर घडलेला प्रसंग कथन केला. त्यावरुन पोलिसांनी आरोपीवर भा.दं.वि. कलम 376, 376 (2), 223, 504, 506 व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. तर बलात्काराची घटना महात्मा फुले ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका मॉलच्या पार्किंगमध्ये घडल्याने हा गुन्हा महात्मा फुले चौक पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या