ती एक कविता

कविता : ती एक कविता 




ती एक कविता काल आली स्वनात ।

हळूच येऊन  सांगू लागली माझ्या कानात।।धृ।।


म्हणाली, मी तुमची राणी घ्याना मज कवेत।

दुसरे कुणी नाही मनी; तुम्हीच मला हवेत ।।

धारदार लेखनशैलीने मी तुमच्या प्रेमात ।।१।।

         हळूच येऊन सांगू लागली माझ्या कानात।।



ती म्हणाली, सामर्थ्य आहे तुमच्या शब्दांत ।

साज शृंगार करून मजला तुम्ही सजवितात।।

म्हणूनच स्थान द्यावे मज तुमच्या हृदयात ।।२।।

         हळूच येऊन सांगू लागली माझ्या कानात।


ती म्हणाली,मी तर असते भलतीच साधी-भोळी ।

तुमच्या शब्दलिलांनी मी नेसते हो साडी-चोळी।।

तुमच्यामुळे हा माझा मान;आज वाढतो जनांत ।।३।।

          हळूच येऊन सांगू लागली माझ्या कानात।



ती म्हणाली, विस्कटलेले शब्द सव्यय-अव्यय।

यमक जुळुनी रचनेला देता ताल सूर अन लय ।।

तुमच्याचमुळे संतोष असतो माझ्या जीवनात ।।४।।

        हळूच येऊन सांगू लागली माझ्या कानात।


 कवी हरिसंतोष 

संतोष गोपाळ सावंत

६ मार्च २०२१

 Mo..: 8779172824/



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या