कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडला मोठी आग.

 कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडला मोठी आग.



डोंबिवली ( शंकर जाधव ) 

कल्याणच्या वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला मोठी आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.अग्निशमक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास  ही आग लागली असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र खाडीच्या दिशेने आग लागलेली असल्याने वाऱ्यामुळे  मोठ्या प्रमाणात आग पसरत होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या