जय महाराष्ट्र शिक्षक कर्मचारी सेना व भारतीय कामगार सेनेचा - खासगी अनुदानित शाळातील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.
मुंबई - सोमवार दि, १५ मार्च २०२१
भारतीय कामगार सेना व जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेना युनियनच्या शिष्टमंडळाने भारतीय कामगार सेना अध्यक्ष्, शिवसेना उपनेते ल खासदार मा. श्री अरविंद सावंत साहेब यांच्या सूचनेनुसार शिक्षणाधिकारी कार्यालयात मा. शिक्षणाधिकारी श्री. महेश पालकर साहेब यांची शिक्षक व कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी भेट घेतली. यावेळी विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून सदर सभेत
१] शिक्षकांची १२ वर्षाची वरिष्ठ वेतन श्रेणी मनपा शिक्षक यांना लागू झाल्यावर त्वरीत खाजगी शाळांना लागू केली जाईल.
२] अतिरिक्त शिक्षक व कर्मचारी यांचा अतिरिक्त सेवाकाळ हा सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरला जाईल.
३] सातवा वेतन आयोगाबाबत आजच प्रशासनाच्या वतीने योग्य पाठपुरावा करून संघटनेला याबाबत लवकरच योग्य माहिती दिली जाईल.
४] सेवानिवृत्ती वेतन दावे लवकरच निकाली काढले जातील.
५] स्टॅपिंग सिस्टीम वेगाने राबवण्यात येईल.
६] मनपा प्रमाणे अर्जित रजा २४० वरून ३०० करण्यासाठी विचाराधीन.
अशा प्रकारची सकारात्मक आश्वासने मा. शिक्षणाधिकारी व मा. उपशिक्षणाधिकारी यांच्याकडून देण्यात आली.
सातवा वेतन आयोग लवकर लागू न झाल्यास करीरोड येथील पालिका शिक्षणाधिकारी कार्यालयात सुमारे ४००० शिक्षक व कर्मचारी यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा कडक इशारा जय महाराष्ट्र युनियनच्या वतीने भारतीय कामगार सेनेचे चिटणीस जितेंद्र जानावळे यांनी दिला..
प्रशासनाच्या वतीने या सभेस मा. शिक्षणाधिकारी श्री. महेश पालकर साहेब, शिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) श्री. राजू तडवी साहेब, उपशिक्षणाधिकारी श्री. किर्तिवर्धन किरतकुडवे, अधीक्षक श्री. किसन केंकरे, श्री. कदम, मुख्य लिपिक श्री. साखरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार मा. श्री.जितेंद्र जानावळे साहेब, संस्थापक/अध्यक्ष श्री. विजय पाटील, कार्याध्यक्ष श्री. सुनिल सुर्वे, सरचिटणीस श्री. संदीप परब, उपाध्यक्षा सौ.गीता राणे, सौ.पूर्वा सकपाळ, संयुक्त सरचिटणीस श्री. दिपक गावडे, पूर्व उपनगर प्रमुख श्री. रामदास हंजनकर, वाॅर्ड अध्यक्षा सौ. स्मिता गाजुल, सौ. जयश्री मोरे, श्री. दिलीप घाडी , श्री. लक्ष्मण दवंडे, श्री. संतोष शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या