उद्योगपती अंबानीच्या घराबाहेर पीपीई किट परिधान केलेली व्यक्ती ही सचिन वाझेच असल्याची एनआयए ला शंका..

 उद्योगपती अंबानीच्या घराबाहेर पीपीई किट परिधान केलेली व्यक्ती ही सचिन वाझेच असल्याची एनआयए ला शंका..


प्रतिनिधी: अवधुत सावंत


सचिन वाझे त्यांच्या विरोधात सापडणारे हे सबळ पुरावे पाहता त्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर उभी असलेली स्कॉर्पिओ गाडीच्या शेजारी पीपीई घालून जी व्यक्ती दिसून आल्याचं एक सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आलं होतं, ती व्यक्ती सचिन वाझेच असल्याची शक्यता एनआयए कडून वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सचिन वाझे यांच्या ड्रायव्हरनेच याबाबतची माहिती एनआयए ला दिलेल्या जबाबात नोंदवल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्याविरोधात सापडणारे हे सबळ पुरावे पाहता त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.


"पीपीई किट घातलेले सचिन वाझेच होते. त्यांनी केरोसीनने तो किट जाळला". असं या जबाबात म्हटलं गेल्याचं कळत आहे. दरम्यान, सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार एनआयए च्या अधिकाऱ्यांनी तपासादरम्यान ताब्यात घेतली आहे. या मर्सिडीज कारमधून बॅग, डायरी, शर्ट आणि काही रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. तसेच एनआयए अधिकाऱ्यांकडून या मर्सिडीज कारची कसून चौकशी सुरू आहे. मुख्य म्हणजे जे कपडे मिळाले आहेत, त्यामध्ये एक शर्ट आहे व हा शर्ट वाझेंनी २४ तारखेला परिधान केला होता त्यामुळे आता संशयाची सर्व दिशा ही वाझेंकडेच पोहोचली आहेत.


दरम्यान एनआयएच्या अधिकाऱ्यांनी या कारची तपासणी केली असून यामध्ये त्यांना मोठया प्रमाणावर रोख रक्कमही सापडली आहे. एक भली मोठी वायर आणि काही कपडेही या कारमध्ये सापडले आहेत. कारमध्ये अनेक डायऱ्याही सापडल्या आहेत. एव्हढंच नव्हे तर या कारमध्ये अनेक नंबर प्लेट्स ही आढळून आल्या आहेत. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही मर्सिडीज कार याठिकाणी आणण्यात आली अशी एनआयए अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे.


उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकं असलेल्या स्कॉर्पिओ कारपासून सुरू झालेल्या या प्रकरणामध्ये आता ही मर्सिडीज कार नेमकी कुठे आहे यायाचाच शोध सध्या एनआयए चे अधिकारी घेत असून चौकशी दरम्यान येत्या काळात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या