टाकळीमिया पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अक्षय करपे यांची निवड
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया पत्रकार संघाची कार्यकारिणी आत्ता नुकतीच जाहीर करण्यात आली टाकळीमिया पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते पत्रकार अक्षय करपे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सिद्धांत सगलागिले खजिनदारपदी प्राध्यापक सुभाष शिंदे सर तर सचिवपदी आप्पासाहेब माळवदे साहेब यांची निवड करण्यात आली कोरोना अभावी कार्य करणी सार्वजनिक ठिकाणी न घेता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केली यावेळी टाकळीमिया पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अक्षय करपे म्हणाले की मध्यंतरी पत्रकारांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्यामुळे पत्रकार समाजातील घटकांवरील अन्यायाला वाचा फोडत असतो पत्रकार हा एकमेव असा घटक आहे की तहान.भूक. हरवळून आपल्या परिवाराची काळजी न करता रात्रंदिवस समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत असतो पत्रकारांना एक रुपयाचाही आर्थिक हातभार नसतानाही काही न बोलता आपले कार्य आपली समाजसेवा अविरतपणे चालू ठेवतो सरकारने पत्रकारांना काहीतरी आर्थिक हातभार लावून पत्रकारांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने काही कडक कायदे तयार केले पाहिजे टाकळीमिया पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अक्षय करपे म्हणाले की माझ्या पत्रकारांना 100% न्याय देण्याचा प्रयत्न करीन टाकळीमिया पत्रकार संघाने अध्यक्ष अक्षय करपे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ऑनलाइन पद्धतीने मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते


0 टिप्पण्या