कल्याण डोंबिवली च्या "क" प्रभागक्षेत्र कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे युनिट चा सापळा..

  कल्याण डोंबिवली च्या "क" प्रभागक्षेत्र कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे युनिट चा सापळा..


प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

कल्याण डोंबिवलीतील दोन लोकसेवक अधिकाऱ्यांना बांधकाम प्रकरणी ₹.१५००० ची लाच स्वीकारताना ठाणे युनिटच्या एसीबी ने काल रंगेहाथ अटक केली आहे. एसीबी ने आतापर्यंत या महापालिकेचे ३७ लाचखोर अधिकारी रंगेहाथ पकडले आहेत. यामध्ये काहीजण कामावर पुन्हा रुजू झाले आहेत तर काही सेवानिवृत्त आहेत.

धक्कादायक बाब अशी आहे की काही अधिकारी दोन वेळा लाच घेताना पकडले गेले आहेत.


मिळलेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिमेतील ठाणकर पाडा परिसरात राहणाऱ्या एका सर्वसामान्य नागरिकाचे चाळीतील बांधकाम सुरू आहे.

चाळीतील खोलीच्या नवीन बांधकामावर पुढील कायदेशीर कारवाई न करण्याकरता ₹.२०,००० च्या लाचेच्या रक्कमेची मागणी केली म्हणून एका ५४ वर्षीय व्यक्तीच्या महापालिका लोकसेवक १. सुहास दत्तू मढवी व लोकसेवक २. भागाजी सखाराम भांगरे यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात केलेल्या  तक्रारीवरून दि.०८.०३.२०२१ रोजी लाचेची पडताळणी केल्यावर लाचलुचपत पथकाच्या ठाणे युनिट ने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या "क" प्रभाग क्षेत्र अतिक्रमण विभागातील लोकसेवक १. कामगार सुहास दत्तू मढवी (वय ५०) रा.सापर्डे यांच्यावर ₹.२०,००० अशी लाचेची मागणी करून तडजोडी अंती ₹.१५,००० ची लाच स्वीकारताना काल दि.१५.०३.२०२१ रोजी सायंकाळी १८:३८ वा सापळा रचून यांना रंगेहाथ पकडले आहे व 

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या "क" प्रभाग क्षेत्राचे प्रभारी प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले आहे.

सापळा अधिकारी म्हणून पोलीस उप अधीक्षक दुबे व पो.निरीक्षक पठारे, पोलीस निरीक्षक प्रजापती, पो.हवा.महाडिक, पो.हवा.योगेंद्र परदेशी, पो.हवा.भावसार, म.पो.ना राखी शिंदे, पो.ना रुपेश पाटील, चालक सपो. उप निरीक्षक कदम  एसीबी , ठाणे यांनी ही कारवाई केली..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या