मला वाटतं जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आलीय सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंच्या व्हॉट्सअप स्टेटसने खळबळ..
प्रतिनिधी: अवधुत सावंत
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यानंतर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची सरकारने बदली केली.
बदलीनंतरच्या काही दिवसांतच वाझे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
चर्चेचं कारण ठरलं आहे त्यांचं व्हॉट्सअप स्टेटस !
मनसुख हिरेन प्रकरणात अजूनही वाझे यांच्या नावाची चर्चा होत असतानाच त्यांनी हे स्टेटस ठेवलं असून, त्यावरून वाझे यांच्या मनात चाललंय काय ?
वाझे यांना काय म्हणायचंय ?
असे प्रश्न उपस्थित करत चर्चा रंगली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे वाझे यांनी स्टेटसमध्ये जगाचा निरोप घेण्यासंदर्भातला उल्लेख केलेला आहे.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरील भाजपा ने विधिमंडळ अधिवेशनात सरकारला धारेवर धरलं होतं.
हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल सवाल करतानाच मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचे तत्कालीन तपास अधिकारी आणि गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते.
भाजपा कडून सातत्यानं मुद्दा लावून धरण्यात आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांच्या बदलीची घोषणा केली होती.
अखेर वाझे यांची बदली करण्यात आली आहे.


0 टिप्पण्या