रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या छम-छम बारवर गुन्हा

 रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या छम-छम बारवर गुन्हा



डोंबिवली ( शंकर जाधव ) 

   डोंबिवलीत रात्री उशिरा पर्यंत इगो डान्स बार सुरु असल्याचा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर मानपाडा पोलिस खडबडून जागे होऊन  बारचालक अशोक पुरुषोत्तम पंडा ( ३८ ,रा. सांगाव)याच्याविरोधात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा आकडा दररोज ४००रुग्णांच्या वर जात असल्याने  अकरा तारखेपासून केडीएमसीने निर्बंध लावले आहे .यात कल्याण डोंबिवली क्षेत्रात दुकाने सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यत सुरु ठेवण्याचे सांगण्यात आले आहे तर हॉटेल, बारला रात्री ११ पर्यत सुरु ठेवण्याचे मुभा दिली आहे. हॉटेल, बार पन्नास टक्के क्षमतेने सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे मात्र याचा गैरफायदा घेऊन कल्याण शीळ रोडवरील  इगो बार रात्री उशिरापर्यंत सुरू होता.या लाईव्ह ऑर्केस्ट्रा  बार  मध्ये कोणतेही सोशल  डिस्टसिंग नव्हते.तर  कोणीही मास्क न  घातल्याचे पाहायला मिळाले . सर्रासपणे बारमध्ये धिगाणा सुरु होता. तसेच महापालिका आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ बार उघडे ठेवून कायद्याचे उल्लंघन केले .या बारच्या धिंगाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. तेव्हा सामान्यांना  एक नियम आणि बारवाल्यांना  कोणतेही  नियम नाहीत का ?  कोरोना इकडे पसरत नाही  का? असा प्रश्न उपस्थित झाला .त्यानंतर मानपाडा पोलीस जागे होऊन दिलेल्या वेळेच्या जास्त काळ बार उघडे ठेवल्या प्रकरणी बारचालक अशोक पंडा विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या