साहित्यिक गोपाळ वेखंडे यांना लोकहिंद वृत्तवाहिनीचा पुरस्कार
ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त ,साप्ताहिक शिवमार्ग व लोक हिंद वृत्तवाहिनीतर्फे दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय 'लोकहिंद गौरव 'पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असून सन २०२१ चा साहित्य क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा 'लोकहिंद गौरव पुरस्कार 'ज्येष्ठ कवी,साहित्यिक, विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री गोपाळ वेखंडे यांना जाहीर झाला आहे
शनिवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ (मराठी राजभाषा दिन) रोजी सकाळी १०.३० वाजता कुमार गार्डन हॉल,शहापुर जिल्हा ठाणे
येथे विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत भव्यदिव्य स्वरूपात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असून आपणही या आनंददायी क्षणाचे साक्षीदार व्हावे याच अपेक्षेने आपणास हेआग्रहाचे निमंत्रण!
आपलाच,
गोपाळ वेखंडे, शहापूर ( ठाणे )


0 टिप्पण्या