डोंबिवलीकरांना कोरोनाचे भय नाही...विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून कोरोनाचे नियम पायदळी

 डोंबिवलीकरांना कोरोनाचे भय नाही...विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून कोरोनाचे नियम पायदळी


डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत नागरिकांनी मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे आणि आवश्यक असल्यास घराबाहेर पडा अशी सरकारने निर्बंध घातले आहेत.कोरोनाबाधीतांची संख्या एकीकडे वाढत असताना दुसरीकडे बेफिकर नागरीक तोंडावर मास्क न घालता घराबाहेर फिरताना दिसतात.पालिका प्रशासन, वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस अश्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत आहेत.मात्र स्टेशनजवळ,बाजारपेठा अश्या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून कोरोनाचे नियम पायदळी तुडवीत आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडून टाळण्यासाठी मास्क वापरा, शिस्त बाळगा असे आवाहन केले आहे.तरीही निष्काजळपणाने घराबाहेर फिरणाऱ्या डोंबिवलीकरांना कोरोनाचे भय नाही असे दिसत आहे.

     अमरावती, धुळे, अकोला येथे कोरोनाबाधितांची दिवसेंदिवस संख्या वाढल्याने येथे काही दिवसांचा लॉकडाऊन केले आहे.कल्याण-डोंबिवली महाननगर हद्दीत ५९९०५ जणांनी कोरोनावर मात केली असून सद्यस्थितीत १२८४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तर आतापर्यत ११६२ जणांचा कोरोनाना बळी घेतला आहे.कोरोनाचा वाढता आलेख पाहता पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कल्याणात गर्दी होत असलेल्या ठिकाणी जनजागृती केली. तर डोंबिवलीत`फ`प्रभाग क्षेत्र अधिकरी राजेश सावंत आणि डोंबिवली वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे यांनी पालिका कर्मचारी व वाहतूक पोलिसानी संयुक्तपणेडोंबिवलीत विनामास्क फिरणारे नागरीक, दुचाकीस्वार, चारचाकी वाहचालक आणि रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई सुरु केली आहे.एवढे करूनही जवळपास डोंबिवलीतील ४० टक्के नागरिक तोंडावर मास्क दिखाव्यापुरती लटकवत असताना दिसतात.तर काही बेफिकीर नागरीक मास्क न वापरता घराबाहेर फिरताना दिसतात.कोरीनाचे भय जगावर असताना आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत आहे अश्या अहंगडात फिरत आहेत.अश्या नागरिकांमुळे कोरोनाला आला बसा बसणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

प्रतिक्रिया

१)       अश्या बेफिकीर नागरिकांवर प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे.कोरोना नियमाचे पालन सर्वानीच करणे बंधनकारक आहे.सरकार, पोलीस, डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी, पालिका अधिकारी हे जीवाचे रान करून कोरोना पसरू नये म्हणून काम करत असतात. निदान त्याचा तरी विचार करून सर्व नागरिकांनी नियमाचे पालन केले पाहिजे. माझ्या दवाखान्यात उपचारासाठी येत असलेल्या रुग्णांना नियमाचे पालन केले पाहिजे असे सांगत असतो.

                                                डॉ.विजय भिरूड

       आयुर्वेदिक निमा संघटना ( बीएएमएस ) कल्याण –डोंबिवली खजिनदार

२ )  कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन केले पाहिजे.सरकारला नागरिकांनी सहकार्य केले तर पुन्हा लॉकडाऊन होणार नाही.डोंबिवलीत जे नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर पोलीस आणि प्रशासनाने कारवाईची बडगा उगारला पाहिजे.

                                                                                                                            वर्षा शिखरे

                              परिवहन विभाग जनरल सेक्रेटरी ( कॉंग्रेस )


३ )  मध्यतंरी कोरोना रुग्णांची संख्या कमी आणि अनलॉक प्रक्रिया यामुळे नागरीक नियमांचे पालन न करता बेफिकीरपाने फिरत आहे. कोरोना नियमांचे कमीत कमी दोन वर्ष तरी पालन करणे आवश्यक आहे.आपल्याला काहीही होणार नाही, आता तर उपचार होऊ शकतात, लसीकरण सुरु आहे अशी मानसिकता काहीनागरिकांनी केली आहे.काळजी घेतली नाही तर शास्त्रीय दृष्टीकोनातून हा आजार होऊ शकतो याची माहिती नागरिकांना देणे आवश्यक आहे.

                                        अद्वैत पाध्ये (  मानोपचार तज्ञ )


४ ) लॉकडाऊन टाळायचा असले तर सर्व नागरिकांनी नियमांचे पालन केले पाहिजे.जे नागरीक नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई झालींच पाहिजे. कोरोनाचे संकट अजून संपले नाही याची जाणीव नसणाऱ्यांनी योग्य माहिती घेणे आवश्यक आहे.

 

                                   देवेन सोनी   (कामा संघटनेचे अध्यक्ष )   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या