पालिकेच्या फेरीवाला अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्याला मारहाण
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे हद्दीत अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिका प्रशासनाकडून कडक कारवाई सुरु आहे.मात्र कारवाई कर्मचाऱ्यांना मारहाण होत असल्याचे अनेक घटना घडल्या आहेत.डोंबिवली पूर्वेकडील के.व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या जवळ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला पाणीपुरी खाणाऱ्या तिघांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली.या घटनेत कर्मचाऱ्याने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, किरण उर्फ टण्या लोटे ( २५, गोळीवली गाव, डोंबिवली ) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याबरोबर सुजित सोनी, दीपक सावंत या दोघांनी मिळून पालिकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती.तर पालिका कर्मचारी जनार्दन भोईर यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डोंबिवली पूर्वेकडील के.व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या जवळ अनधिकृत फेरीवाल्यांवर नेहमीप्रमाणे कारवाई करत होते.एका पाणीपुरीच्या गाडीवर कर्मचारी कारवाई या तिघांनी कारवाईत अडथळा आणला.पालिकेचे कर्मचारी कारवाई करू नये या तिघांनी कर्मचारी जनार्दन भोईर यांना मारहाण केली.भोईर यांसह पालिकेचे पथकप्रमुख आणि इतर कर्मचाऱ्यांनी मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वणवे अधिक तपास करत आहेत.या प्रकरणानंतर पालिकेचे फेरीवाला अतिक्रमण विभागाने आणि मानपाडा पोलिसांनी के.व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या जवळ अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई सुरु केली.कारवाईच्या भीतीने फेरीवाल्याने सदर ठिकाणी एका दिवसाकरता आपली गाडी लावली नाही.दरम्यान के.व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या जवळ अनधिकृत फेरीवाले वाढले असून ते कोणाच्या आशीर्वादाने फेरीवाले बसत आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.

0 टिप्पण्या