कविता- प्रिय कविते

 प्रिय कविते


जेंव्हा तूं मनातून कागदावर अवतरतेस

त्या अगोदर किती तू साजसृगांर करतेस...


कधी तू तन्हुल्या बाळासवे भासतेस

कधी तू  वा-याच्या मंदमंद झुळकेसवे भासतेस...


कधी येताना कळीसम भासतेस

पूर्ण बहरल्यावर फुलासम मंद सुवास दरवळतेस..


कधी लटक्या चालीसम यौवनी भासतेस

कधी मृग कंचनापरी चपळाईने अवतरतेस...


कधी रुसवे फुगवे धरून बसतेस

कधी लाडीकपणे अंगाखांद्यावर खेळतेस...


तुझ्या येण्याची जेंव्हा जेंव्हा चाहूल लागते

नकळतच मनामधून तू कागदावर अवतरतेस...


रचनाकार ©️®️🖋️ सुदामसूत.

कल्याण प, जिल्हा ठाणे.

महाराष्ट्र राज्य.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या