कित्येक वर्षाची प्रतिक्षा जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेना युनियनने संपवली
शिक्षकेत्तर कर्मचारी एकजुटीचा ऐतिहासिक विजय
बहुचर्चित व बहुप्रतिक्षित १२ व २४ वर्षा
ची कालबद्ध पदोन्नती मंजूरशिक्षकांना कालबद्ध पदोन्नतीच्या आधारे वरिष्ठवेतनश्रेणी देण्यात आली. त्याच धर्तीवर शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सुद्धा कालबद्ध पदोन्नती मिळावी यासाठी जय महाराष्ट्र टीमनेच प्रथमतः दि.20 डिसेंबर- 2019 च्या मा.आयुक्त कार्यालयात आयोजित केलेल्या संयुक्त सभेतच मंजुरी मिळवली होती.
खऱ्या अर्थाने आज त्याला यश मिळाले
शिवसेना नेते व खासदार मा.श्री. संजय राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेना युनियनने दि. २० डिसेंबर २०१९ रोजीच्या संयुक्त सभेत हा विषय प्रामुख्याने मांडला होता. त्याला तत्कालीन आयुक्त मा. श्री. प्रविणसिंह परदेशी साहेब यांनी मंजुरी दिली होती. तसेच त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून सादर करावा असे संबंधित अधिकारी यांना आदेशही देण्यात आले होते. त्यानंतर जय महाराष्ट्र टीमने सदर प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर होण्यासाठी अनेक वेळा त्याबाबत पाठपुरावा व पत्रव्यवहार चालू ठेवला होता. अखेर सदर प्रस्ताव मंजूर होऊन त्याबाबतचे परिपत्रक आज पारित करण्यात आले.
शिवसेना नेते व खासदार मा.श्री.संजय राऊत साहेब यांच्या पुढाकाराने तसेच शिवसेना उपनेते व भारतीय कामगार सेना महासंघाचे अध्यक्ष मा.श्री. सुर्यकांत महाडिक साहेब , शिवसेना आमदार व जय महाराष्ट्र संघटनेचे प्रमुख सल्लागार मा.श्री. सुनिल राऊत साहेब, प्रमुख सल्लागार मा.श्री.साईनाथ दुर्गे साहेब, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस व जय महाराष्ट्र संघटनेचे प्रमुख सल्लागार मा.श्री. जितेंद्र जानावळे साहेब यांच्या सहकार्याने आणि संघटनेचे संस्थापक/ अध्यक्ष श्री.विजय पाटील, कार्याध्यक्ष श्री सुनिल सुर्वे, सरचिटणीसश्री.विकास कांबळे व श्री.संदीप परब, सेवा निवृत्ती कक्षप्रमुख श्रीम.कांचन मस्के, उपाध्यक्ष श्री.भास्कर रोंगटे व इतर पदाधिकारी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सन्मा.लिपिक व शिपाई यांना १२ व २४ वर्षाची कालबध्द पदोन्नती मिळवून देता आली.
अनेक वर्षाची प्रतिक्षा संपवून सन्मा. लिपिक व शिपाई यांना आता आनंदाचे दिवस उपभोगता येणार आहेत. याबद्दल सर्व सन्मा. लिपिक व शिपाई यांचे संघटनेच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
यासाठी सन्मा. महापौर श्रीम. किशोरी पेडणेकर, शिक्षण समिती अध्यक्षा मा.श्रीम.अंजली नाईक, सन्मा.प्रमुख लेखापाल श्री.प्रदीप पडवळ साहेब, सन्मा. सह.आयुक्त श्री. आशुतोष सलिल साहेब, सन्मा. शिक्षणाधिकारी श्री. महेश पालकर साहेब, उपशिक्षणाधिकारी मा.श्री.किर्तिवर्धन किरीतकुडवे साहेब, अधीक्षक श्री. किसन केंकरे साहेब, उपप्रमुख लेखापाल श्री. राजेंद्र पवार, मुख्य लिपिक श्री. रमेश सोलंकी, तसेच श्री.महांगरे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याबद्दल सर्व सन्मा. मान्यवर व अधिकारी यांचे संघटनेच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक आभार.
समस्त प्रमुख पदाधिकारी, परिमंडळ प्रमुख, वाॅर्ड अध्यक्ष, वाॅर्ड संघटक व असंख्य सभासद.
🚩 जय महाराष्ट्र टीम 🚩
0 टिप्पण्या