आलाय टक्कर द्यायला कोरोणा
लस नाही,इलाज नाही ,
नाही कुठले औषध ,
मानवा तुला टक्कर दयायला,
आलाय कोरोना व्हायरस.....
घरचे मालक , मालकीण,
करत आहेत घरात घरकाम ,
काम वाली बाई मात्र ,
घेत आहे फुकटचा दाम......
काम धंद्यांचा मिटर् आहे डाउन,
फुल ड्यूटी करत आहेत,
पायजमा आणि गाऊन,
कपाटात बंद पडुन हसत आहेत,
पॅन्ट, शर्ट आणि टाई ,
नको करू माणसा घराबाहेर पडण्याची घाई.....
थांबले सर्व सैर सपाटा ,
बंद झाल्या विदेशी यात्रा ,
आता करा घरातच ,
चारो धांमची जत्रा.....
बंद झाले रेस्टॉरेंट बंद झालीत होटेल,
ना चाट मसाला नाही कुठे चायनीज राईस,
घरच्या डाळ रोटीत रहा खुश,
तिच सर्वांची रसमलाई आणि मिठाई....
धुवा हात बार, बार ,
तोंडाला लावा मास्क ,
घर, गांव, शहरे ठेवूया साफ,
तेव्हाच करू कोरोनावर मात.......
ए बी पी माझा सांगतो,
ऊघडा डोळे बघा निट,
एेका त्याचे आणि ,
रहा घरातच सुरक्षित.
लस नाही,इलाज नाही ,
नाही कुठले औषध ,
मानवा तुला टक्कर दयायला,
आलाय कोरोना व्हायरस ,
*शाम परशुराम बैसाणे*
5 टिप्पण्या
Khup Chhan.. Shabd Rachna mastach.. Maja aali
उत्तर द्याहटवाKhup Chhan.. Shabd Rachna mastach.. Maja aali
उत्तर द्याहटवाKhupach Chaan !! Apratim !
उत्तर द्याहटवा👌👌👌👌 khup Chan
उत्तर द्याहटवाVery nice shyambhau.. keep it up
उत्तर द्याहटवा