कविता : पावसा तू असा कसा?

कविता : पावसा तू असा कसा? 


पावसा रे पावसा तू असा रे कसा?
कधी पडशी थोडासा तर कधी पुष्कळसा ||धृ||
धो-धो बरसलास म्हणून केली होती पेरणी |
बियाणं अंकुरलं पण गेले करपूनी||
बळीराजाने कसा ठेवावा तुझ्यावरी भरवसा ||१||
आठवड्यांन परतलास केली दुबार पेरणी |
कसं-बसं बियाणं ते आले उगवूनी||
मोठया मेहनतीने रोपे रोवली होती रसा ||२||
अवनीवरती रोपे डोलती होती छान |
पण अतिवृष्टीने रोपे गेली मोडून-वाकून ||
सांग बाबा वरुणराजा, छळतो का रे असा?||३||
जगाचा पोशिंदा नित्य भोगतो यातना |
कुणालाही कळेना हो त्यांच्या या वेदना ||
हताश बळीराजा स्वगळा घालितो रे फासा ||४||
 

कवी संतोष ऊर्फ (हरिसंतोष) सावंत 

  दि२२ जुलै २०२०

8779172824

9324389918

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या