कल्याण डोंबिवलीच्या हॉटस्पॉट क्षेत्रात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवला*

कल्याण डोंबिवलीच्या हॉटस्पॉट क्षेत्रात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवला* 

हॉटस्पॉट क्षेत्रात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवला  असून
 उर्वरित क्षेत्रात दुकाने सुरू राहणार... याबाबत केडीएमसी प्रशासनातर्फे नुकतेच नविन आदेश जारी करण्यात आले आहेत. 19 जुलै रोजी संपूर्ण केडीएमसी क्षेत्रातील लॉकडाऊन उठवत केवळ कोरोनाचे हॉटस्पॉट असणाऱ्या परिसरात लागू करण्यात आला होता. त्याची मुदत आज (शुक्रवार 31 जुलै) संध्याकाळी 5 वाजता संपल्याने केडीएमसीतर्फे हे नविन आदेश देण्यात आले आहेत.तर गेल्यावेळी 48 वर असणारी कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रांची संख्या आता 62 झाली आहे. ही 62 क्षेत्र वगळता उर्वरित ठिकाणी पूर्वीप्रमाणेच नियम आणि अटींसह दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर यापूर्वी दुकाने सुरू ठेवण्यासाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 ऐवजी आता सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अशी 2 तासांची वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर मिशन बिगीन अंतर्गत आणखी काही क्षेत्रांना व्यवहार सुरू करण्यासाठी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
*काय आहेत आताचे नियम*
■केडीएमसीने जाहीर केलेल्या हॉटस्पॉट क्षेत्रात 31 ऑगस्ट 2020 च्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार लॉकडाऊन…
◆जिम, स्विमिंग पूल बंदच राहणार…
■हॉटस्पॉट क्षेत्र वगळता संपूर्ण शहरात मिशन बिगीन अगेनप्रमाणे कार्यवाही…
◆मॉल्स, मार्केट आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स राहणार बंद…
◆सर्व भाजी मार्केटसह बाजारपेठ आणि दुकाने पी1- पी2 नूसार चालवण्यास परवानगी…
◆सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार दुकाने…
◆प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि पोलीस ठरवणार पी1 – पी2…
◆खुल्या मैदानातील सांघिक नसलेल्या (जिम्नॅस्टिक, मल्लखांब, टेनिस) खेळांना नियम अटी पाळून परवानगी..
◆घरपोच सेवा देणारे रेस्टॉरंट आणि आहारकेंद्र सुरू ठेवण्यास परवानगी…
◆हॉटस्पॉट क्षेत्राबाहेर घरपोच मद्यविक्रीला परवानगी…
◆मोठ्या स्वरूपाच्या कार्यक्रम, समारंभांना बंदी…
◆ओपन लॉन्स, वातानुकूलित नसलेल्या हॉलमध्ये विवाह सोहळ्याला अटी शर्थीनुसार परवानगी…
◆लग्नाला 50 पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती नको…
◆हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये पूर्वीप्रमाणेच निर्बंध लागू राहणार.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या