राजापूर- राजापूर मधील झोमॅटो फिडींग इंडिया ही संस्था देशात विविध सामाजिक उपक्रम राबवित असून या संस्थेचे रत्नागिरी संपर्क प्रमुख श्री मोईन अहमद व राजापूर संपर्क प्रमुख श्री मकसूद मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली जैतापूर आगरवाडी श्री देव लक्ष्मी नारायण मंदिर व श्री देव महेश्वर मंदिर येथे समाजातील गरजू व्यक्तींना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले ..
... .या कार्यक्रमाला संस्थेचे राजापूर तालुका संपर्क प्रमुख श्री मकसूद मापारी तसेच आगरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री प्रदिप मांजरेकर,मंगेश मांजरेकर,संजय मांजरेकर,दिवाकर आडविरकर, महादेव शिवलकर,भागेश पंगेरकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते संस्थेने केलेल्या बहुमोल मदतीबद्दल जैतापूर ग्रामपंचायत सदस्य दिवाकर आडविरकर यांनी आभार मानले .
..... .... या संस्थेने नुकतेच निसर्ग वादळात नुकसान झालेल्या मंडणगड, दापोली तालुक्यातील वादग्रस्तांना मदत करून सामाजिक बांधिलकी जपली पत्रकार महेश शिवलकर यांच्या सहकार्याने आगरवाडी येथील गरजूंना हि मदत देण्यात आली, अशी माहिती आमचे प्रतिनिधी प्रमोद तरळ यांनी दिली
0 टिप्पण्या