*कल्याण डोंबिवलीत कोरोना मृत रुग्ण संख्या ३०७ वर आली*
*३३० नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू ; १८,४९५ एकूण रुग्ण तर ३०७ जणांचा आतापर्यंत मृत्यू*
कल्याण 26 जुलै : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांनाच मृतांचा आकडा देखील तेवढाच वाढत आहे. पालिका क्षेत्रातील कोरोना मृतांनी ३०० चा टप्पा ओलांडला असून आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल ३०७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ३३० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून २१६ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३३० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १८,४९५ झाली आहे. यामध्ये ५८२३ रुग्ण उपचार घेत असून १२,३६५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ३०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३३० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व -८३, कल्याण प.-६७, डोंबिवली पूर्व -९९, डोंबिवली प-४५, मांडा टिटवाळा ९, मोहना १६ तर पिसवली येथील ८ रूग्णांचा समावेश आहे.
डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १२४ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १६ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, १२ रुग्ण बाज आर. आर. रूग्णालयामधून, होलीक्रोस रुग्णालयातून २ रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

0 टिप्पण्या