🎵 ध्रुवपद
जगी या कोण कुणाचा नाही,
जो तो आपुला स्वार्थ पाही!
अंतरा १
सगे सोयरे भाऊ बहीण,
संकटसमयी जाती सोडून!
वरवरचा दिखावा दाखवी,
कुणी सोबत ना राही!
अंतरा २
सुखामध्ये सारेच येती,
दुःखामध्ये पाठ फिरविती!
गरज संपता ओळख विसरती,
मायेची ऊब ना काही!
अंतरा ३
धनदौलतीला मान मिळे,
गरीब माणसाला कोण पुसे!
स्वार्थापोटी नाती जपती,
खरे प्रेम कुणाच्या ठायी!
अंतरा ४
जीवन म्हणजे चार दिवसांचे,
नाटक सारे या दुनियेचे!
कशाला मोठेपणाची घाई!
जाताना कुणी काहीच नेत नाही
अंतरा ५
सत्याची कास धरावी,
माणुसकीची ज्योत पेटवावी!
सागोसूत म्हणे निःस्वार्थी राहावे,
हीच खरी जीवनाची पुण्याई!
*********
गीतकाराची नाममुद्रा
कवी : संतोष गोपाळ सावंत ऊर्फ सागोसूत हरिसंतोष
गीतकार, गायक, पत्रकार, संपादक, प्रकाशक, शाहीर, निवेदक, नाटककार, दशावतार नाट्यकलाकार, भजनी बुवा.
दिनांक : 13 नोव्हेंबर २०२६

0 टिप्पण्या