मराठी अभिनेता नानावरी काळाने घातला घाला,का बरं अकस्मात तुम्ही इहलोक सोडूनि गेला…

मराठी रंगभूमीपासून चित्रपटसृष्टीपर्यंत,
अभिनयाची छाप उमटविली मनामनांत।
हिंदी चित्रपटसृष्टीतही गाजविला तुम्ही डंका,
फिका पडला मोठमोठ्यांचा झगमगाट, ताकद होती अभिनयात॥

कधी कठोर भूमिका, कधी मायेचा ओलावा,
प्रत्येक पात्रामध्ये दिसला तुमचा जिवंतपणा।
संवादांच्या प्रत्येक शब्दाला दिलात नवा अर्थ,
अभिनयाच्या सामर्थ्याने जिंकलात जनतेच्या मना ॥

पडद्यावर येताच नजर खिळून राहायची,
तुमच्या अभिनयाची जादू मनामध्ये उतरायची।
हसविले, रडविले, विचार करायला लावले,
कलेच्या विश्वामध्ये अजरामर स्थान मिळविले॥

आज काळाचा पडदा तुमच्यावर पडला,
रसिकांच्या डोळ्यांत अश्रूंचा सागर दाटला।
नाना, तुमची आठवण सदैव मनात राहील,
तुमची कला पिढ्यान्‌पिढ्या जगत राहील॥

काळाने नेले आज तुम्हांस आमच्यापासून दूर,
पण तुमचा अभिनय राहील सदैव भरपूर।
रसिकांच्या हृदयात तुम्ही सदैव जिवंत राहाल,
नाना पाटेकर म्हणून सदैव आदराने स्मरले जाल!

🙏 भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏
कवी : संतोष गोपाळ सावंत ऊर्फ सागोसूत हरिसंतोष
(८ ऑक्टोबर २०२६)
8779172824

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या