आयआयटी विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी विद्यार्थी संघटनांतर्फे आयआयटी मुंबईच्या मुख्य प्रवेशद्वारावर जाहीर निषेध

दिनांक: २१/०९/२०२६
मुंबई. प्रतिनिधी.

आयआयटी मुंबई बाहेर विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींची पोलिसांकडून झालेल्या धरपकडीचा निषेध! शैक्षणिक संस्था जातीवादी अन्यायाच्या केंद्र बनत असतील तर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे! साहिल वाकोडे ला न्याय मिळालाच पाहिजे! दि. २१/०९/२०२६ रोजी दुपारी १.३० वाजता साहिल वाकोडे या आयआयटी विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी विद्यार्थी संघटनांतर्फे आयआयटी मुंबईच्या मुख्य प्रवेशद्वारावर निषेध नोंदवण्यात आला. यावेळी पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा साम्या कोरडे, छात्रभारतीचे राज्य कार्याध्यक्ष सचिन काकड, कॉक्रोच जनता पार्टीचे साहिल पार्सेकर, आमची पढाई आमची लढाई संघटनेचे तेजस अनुप आणि इतर संघटनेच्या एकूण ९ कार्यकर्त्यांना पोलिसांकडून दबावतंत्राचा वापर करून ताब्यात घेण्यात आले. सर्वांना पवई पोलीस स्टेशन इथे थांबवून सायंकाळी ५ वाजता सोडण्यात आले. २०२३ साली आयआयटी मुंबईत आत्महत्या केलेल्या दर्शन सोलंकी या दलित विद्यार्थ्याचे वडील कमलेश सोलंकी हेदेखील गुजरातवरून या आंदोलनसाठी मुंबईत दाखल झाले होते. 
  आयआयटी मुंबई मधे मागील ९ महिन्यांपासून एकूण ४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सोहेल सागवान, नमन अग्रवाल, रोहित आणि आत्ता साहिल वाकोडे याने आपला जीव गमावला आहे. या केवळ आत्महत्या नसून संस्थात्मक खून असल्याचं विद्यार्थी संघटनांनी म्हटलं आहे. या घटनांचं उत्तरदायित्व घेऊन संचालक केदारे आणि डीन सत्यनारायण डुला यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे ही मागणीदेखील विद्यार्थी संघटनांनी केली.
        साहिलने मागील ६ महिन्यांपासून त्याच्यासोबत जातीवाचक व्यवहार होत असल्याचे व त्याला यावरून त्याला एखाद्या प्रकरणात अडकवल्या जाण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे त्याने आई- वडिलांना कळवले होते. या छळाला कंटाळूनच साहिल आत्महत्येला परवृत्त झाला. FIR दाखल होऊनही अजून एकाही आरोपीला अटक झालेली नसल्याप्रकरणीही विद्यार्थ्यांनी आपला संताप नोंदवला. आयआयटी मुंबईच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर जे विद्यार्थी आत्तापर्यंत जातिभेदावरून आत्महत्या करण्यास परावृत्त झाले त्यातील रोहित वेमुला, पायल तडवी, दर्शन सोलंकी, साहिल वाकोडे यांच्या फोटोसमोर विद्यार्थ्यांनी मेनबत्त्या लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. शैक्षणिक संस्था या अशाप्रकारे कोणत्याही भेदाचा आणि जातीवाचक अन्यायाच्या केंद्र बनू नयेत यासाठीही विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला. साहिलला आत्महत्या करण्यास परावृत्त करणाऱ्यांस तातडीने अटक किंवा कारवाई न केल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला.

भूषण सहदेव तांबे 
पत्रकार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या