अचानक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ डोंबिवली पश्चिमच्या वतीने मोफत नेत्र चिकिस्तक शिबीर संपन्न.



प्रतिनिधी : रविंद्र जाधव, डोंबिवली. 


अचानक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ डोंबिवली पश्चिम यांच्या वतीने भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश मंडपामध्ये रविवार २० सप्टेंबर रोजी मोफत  नेत्र चिकित्सक शिबीर आयोजित करण्यात आले होते. दरवर्षी सामाजिक शैक्षणिक उपक्रमावर भर दिला जातो असे पदाधिकारी यांनी सांगितले . तर या मंडळाशी आपले नाते दहा-पंधरा वर्षे असून हे मंडळ विविध सामाजिक उपक्रम  व शैक्षणिक उपक्रम राबवत असतात.गेल्या वर्षी सुद्धा पन्नास च्या वरती नागरिकांनी वैद्यकीय शिबिरात भाग घेतला होता तर या  वेळी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र चिकित्स्क शिबिराचे आयोजन केले असून नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे नगरसेवक नंदु शांताराम म्हात्रे यांनी सांगितले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष निखिल शेलार उपाध्यक्ष सतीश सोनवणे खजिनदार राजू म्हात्रे सचिव संजय पाटील.सल्लगार श्रीकांत बिरमोळे सदानंद म्हात्रे पदाधिकारी समृद्ध म्हात्रे अथर्व म्हात्रे स्वीकृत जोशी विशाल सोनवणे साईल चौधरी दर्शन आणि स्वप्नील परमार यांनी मेहनत घेतली तर हे शिबीर परेल येथील  केबी हाजी बच्चुभाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉक्टर रेश्मा आणि त्यांची टीम यांच्या दक्षतेखाली राबविण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या