मुंबई: मिरांश ममता मयूर आढाव यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त कवी सुभाष आढाव यांच्या ' रानपाखरं ' बालकविता स़ंग्रहाचे मधु कांबळे, पत्रकार यांच्या हस्ते मंगळवार दि.८ सप्टेंबर २०२६ रोजी गोवंडी गावदेवी ट्रस्ट , बालवाडी, गोवंडी,मुंबई येथे प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
ह्या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक बी.अनिल तथा अनिल भालेराव, नगरसेवक - गटनेता(बृ.मुं.म.पा.) विजय उबाळे, विजय पाटील ( शिवसेना संपर्कप्रमुख शिराळा वाळवा विधानसभा), विलास कांबळे (विश्वस्त - कुमुद मेमोरियल फंड ),सुनीता कोळी (सेवानिवृत्त मुख्याध्यापिका - कुमुद विद्यामंदिर मराठी प्राथमिक विभाग ), डॉ.सत्तार खान (सरचिटणीस - मुंबई काँग्रेस-रोजगार व स्वयंरोजगार विभाग), ॲड. प्रफुल्ल चव्हाण (अधिवक्ता उच्च न्यायालय), जे.के.कांबळे (संपादक महाराष्ट्र सिव्हिल टाईम्स), सागर तायडे (अध्यक्ष-स्वतंत्र मजदूर युनियन), भिमसेन तपासे(संस्थापक -लुम्बिनी वृक्ष संवर्धन समिती) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर संभाजी भोरे करणार आहेत.

0 टिप्पण्या