मराठा साम्राज्याचा नकाशा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी आझाद मैदानावर आक्रोश मोर्चा...


एनसिईआरटी ने सीबीएससी च्या आठवीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याने संपूर्ण महाराष्ट्रात असंतोषाची लाट पसरली असून त्याचा प्रत्यय आज आझाद मैदानावर आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आला.

नागपूर संस्थानचे वंशज मुधोजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांनी उपस्थिती दर्शवली.

मराठा साम्राज्याचा नकाशा CBSE बोर्डाने अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, प्रशासनाने यात लक्ष घालावे. दिल्लीच्या जंतरमंतरवर मराठ्यांना आंदोलनाची वेळ येऊ देऊ नये, असा ईशारा मुधोजीराजे भोसले यांनी दिला.

यावेळी तमाम महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटना तसेच स्वराज्यप्रेमींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी नागपूर संस्थानचे वंशज मुधोजी राजे भोसले, पानिपत येथील मराठा वंशज रामनारायण भोसले परिवार, नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज कुनाल मालुसरे, सुरेंद्र इंगळे, जाधव घराण्याचे वंशज शिवाजीराजे जाधव, नानासाहेब जावळे पाटील(छावा संघटना), राहुल ढेंबरे पाटील(शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य), बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांचे वंशज ॲड.आशिषराजे गायकवाड, विरेंद्र पवार यांनी मराठा साम्राज्याचा नकाशाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन इतिहास अभ्यासक ललित पाटील यांनी केले.

यावेळी नामदेवराव जाधव, मराठा क्रांती मोर्चाचे डॉ कांचन पाटील,प्रशांत सावंत,अरुण काकडे,सचिन गायकवाड,ऋषिकेश काकडे, नवनाथ गायकवाड, बाळासाहेब इंगळे तसेच शालेय विद्यार्थी, नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

महाराष्ट्राचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकजजी भोईर यांनी आंदोलनस्थळी भेट देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळाला आमंत्रित केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या