सेंट झेवियर्स महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळ (MVM), आपल्या गौरवशाली १०२ वर्षांच्या परंपरेसह, यावर्षीच्या उपक्रमांची सुरुवात

 






सेंट झेवियर्स महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळ (MVM), आपल्या गौरवशाली १०२ वर्षांच्या परंपरेसह, यावर्षीच्या उपक्रमांची सुरुवात “प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे… प्रेम असतं” या अर्थपूर्ण संकल्पनेवर झाली.



राष्ट्रगीत आणि मराठी गीतानं प्रारंभ झालेल्या या सोहळ्यात प्राचार्या करुणा गोकर्ण यांनी मंडळाच्या सातत्यपूर्ण वाटचालीचा गौरव केला, तर प्रा. डॉ. प्रशांत रतनपारखी यांनी मंडळाची मराठी साहित्य, नाट्य व संस्कृतीच्या जपणुकीतील भूमिका अधोरेखित केली.



संध्येचं विशेष आकर्षण ठरले रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आलोक राजवाडे आणि पर्ण पेठे. प्रेम, कला, मैत्री आणि साधेपणातील सौंदर्याविषयी त्यांनी केलेलं हृदयस्पर्शी चिंतन श्रोत्यांच्या मनाला भिडलं आणि सभागृहात आत्मीयतेचं वातावरण निर्माण झालं.


यानंतर विद्यार्थ्यांच्या नाटिका, गीत संगीत व नृत्यांनी प्रेमाच्या असंख्य छटा प्रणय, पालकत्व, आध्यात्मिकता व मैत्री रंगमंचावर खुल्या केल्या.

कृतज्ञता आणि आनंदाच्या स्वरात संपलेला हा सोहळा केवळ उद्घाटन नव्हता, तर मराठी वाङ्मय मंडळ हे महाविद्यालयीन संस्कृतीचं स्पंदन आणि मराठी साहित्यिक परंपरेचं अखंड दीपस्तंभ असल्याची पुन्हा एकदा प्रखर जाणीव करून देणारा ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या