58 व्या युथ फेस्टिवल मुंबई विद्यापीठांमध्ये वंदे मातरम महाविद्यालयाचे नावलौकिक व पालका सहित कौतुक सोहळा


डोंबिवली स्थित जेएमएफ वंदे मातरम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये आपले नाव सुवर्ण अक्षराने कोरले. 58 व्या युथ फेस्टिवल मध्ये मुंबई विद्यापीठातील 300 च्या वर 12 झोन मधुन 27 कॉलेजमध्ये वंदे मातरम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी माईम ॲक्ट मध्ये सुवर्णपदक पटकावले तसेच मराठी नाटक माझी शाळा यामध्ये 350 च्या वर 12 झोन मध्ये 47 कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता आणि यात रौप्य पदक पटकविणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांचा कौतुक व गुणगौरव सोहळा वंदे मातरम महाविद्यालयाच्या मधुबन बँक्वेट हॉलमध्ये आज दिनांक 27/09/2025 रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्मा.डॉ.राजकुमार कोल्हे सर यांच्या नियोजनाखाली पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चीफ एडिटर C न्यूज भारत चैनल दिल्ली श्री.पवन शर्मा हे उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना आई-वडिलांची सेवा आणि सन्मान करण्याचे सांगितले. संस्थेच्या सचिव डॉ. सौं.प्रेरणा कोल्हे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मेहनत किती महत्त्वाची आहे 



जेणेकरून आयुष्यामध्ये आपल्याला यश प्राप्त करता येते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्मा.डॉ.राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी हे आमच्याकडे विद्यार्थी म्हणून शिकतात आणि इथेच परिवाराचा एक हिस्सा म्हणून नोकरीही करतात.सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही आजच्या या कार्यक्रम प्रसंगी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांना आपल्या पाल्याचे कौतुक बघुन अतिशय आनंद झाला होता व डोळ्यात आनंदाश्रू. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. एन.नाडार  यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. असेच यश संपादन करत रहा असेही मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमाला ब्रह्माकुमारीज चे  डॉ . कुमार सर, उपप्राचार्य डॉ.वनिता लोखंडे,प्रमुख समन्वयक मंजूला ढवळे हेही उपस्थित होते. या कौतुक सोहळ्यात अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले आणि आपले अनुभव सांगितले. नाटकाचे दिग्दर्शक प्रथमेश देवकोळे आणि शुभम जाधव यांच्या मार्गदर्शन प्राप्त झाले. तसेच प्राध्यापिका मृणाली जाधव यांनी मुलांच्या तयारी ला मोलाचे सहकार्य केले.  कार्यक्रमाला संपूर्ण महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

माइम सहभागी (Mime Act)

पराग सुतार,तन्वी गुरव,दिवेश मोहिते,निधी अमीन,मितेश पाटील,मंथन पाटील


साथीदार 

मयंक कोठारी,स्नेहा मिश्रा


माझी शाळा स्किट सहभागी (Skit)

दिवेश मोहिते,तन्वी गुरव,यश बडेकर,साई कुड्तुडकर,दुर्वा घाडी,सानिका तांबोळी


साथीदार 

आयुष सावंत,संस्कार कदम

 या कार्यक्रमाचे टिळक देऊन स्वागत सौ  खुशबू दुबे तसेच सूत्रसंचालन प्रा.एकनाथ चौधरी आणि प्रा.सुनिता पाटील यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या