१९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला आणि भारतीय नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क आणि अधिकार मिळाले त्याच मातृभूमीसाठी आणि आपल्या शूर वीर जवानांना कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे १५ ऑगस्ट.
योगायोग हाच की गोकुळ अष्टमी देखील याच दिवशी असल्या कारणाने मोठ्या जल्लोषात उत्सवच साजरा करण्यात आला.
जे एम एफ संस्थे अंतर्गत जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर तसेच कनिष्ठ महाविद्यालय व वंदे मातरम् पदवी महाविद्यालययाच्या प्रांगणात झेंडा वंदन करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे, प्रमुख पाहुणे डॉ.गुजराथी तसेच इतर पदाधिकारी व सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना दिली त्यावेळी संगीत शिक्षिका सौ श्रेया कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगान व झेंडगीत गाऊन सलामी दिली.
इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थांनी संचलन केले. मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेची व श्रीकृष्णांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले व सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली.
इयत्ता दुसरीच्या विद्यार्थांनी देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितींची मने जिंकली.त्याच बरोबर नृत्य शिक्षक अभिषेक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर नृत्य तर शिक्षिका कविता गुप्ता व नितेश मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर नाटक सादर केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देखील भाषण व नृत्य सादर केले.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला स्वातंत्य मिळाले आणि भारतीय एकात्मता हीच भारताचा अमूल्य ठेवा म्हणून भारत देशाची ओळख निर्माण झाली , "भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत." ही वचनबद्ध प्रतिज्ञा प्रत्येक भारतीयांच्या मनात , हृदयात कृतज्ञता पूर्वक एकात्मतेचे प्रतीक बनून राहिली , असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले.तर देशाच्या सीमेवर जाऊन लढले म्हणजेच देशसेवा केली असे नाही तर कुठेही कचरा न टाकता स्वच्छ भारत, सुंदर भारत करणे ही सुद्धा देशाचीच सेवा आहे असे संस्थापिका सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले. यावेळी १९४७ सालापासून ते २०२५ पर्यंत च्या काळात कोणकोणत्या अलौकिक घटना घडल्या त्या घटना क्रमांकाची चित्रफित दाखवण्यात आली. पुस्तकी इतिहासाच्या अभ्यासा बरोबरच त्या काळी घडत असलेल्या घटना विद्यार्थ्यांना बघून समजावा असा इतिहास दाखवण्यात आला , संस्थापक डॉ राजकुमार कोल्हे यांनी प्रत्येक घटनेचे सविस्तर वर्णन करून विद्यार्थ्यांना समजून सांगितले. प्रसार माध्यमाचे मुख्य संपादक रोहित राजगुरु , अखिल नायडू व त्यांच्या चमू ने चित्रफित तयार केली.
स्वातंत्र दिनाचा कार्यक्रम झाल्यावर लगेचच बाळगोपाल्यांच्या आवडीचा कृष्ण जन्माष्टमी सोहळा व दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थांनी कृष्णाचे सुंदर गीत गाऊन भक्तीमय वातावरण तयार केले तर नाट्य शिक्षक श्री.प्रमोद पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राधा कृष्ण नाटक सादर केले व इतर विद्यार्थांनी रासलीला नृत्य सादर केले.
"लाख असतील कृष्ण कालिंदीच्या तटाला, राधेस जो मिळाला तो एकटाच उरला.." सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी सुंदर अशा पंक्ती म्हणून आपल्या कृष्ण कथेला सुरुवात केली. स्वातंत्र्य दीन आणि कृष्ण जन्म हा एकाच दिवशी आला हा योगायोग आहेच खरे, पण या दोन्ही गोष्टीत एकच साम्य आहे ते म्हणजे ,दोन्हीकडे असणारे 'तुरुंग ' बराच काही इतिहास सांगून जातो , ज्यादिवशी स्वतंत्र मिळालं तेव्हा देशासाठी तुरुंगात असलेले वीर बाहेर पडले व स्वतंत्र झाले तर श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात झाला आणि तोही कंसाच्या तावडीतून वाचण्यासाठी तुरुंगातून बाहेर पडला...असा इतिहास म्हणजे कर्मा साठी आणि धर्मासाठी असलेला दैवी दुवा आहे असेही डॉ.प्रेरणा कोल्हे यांनी नमूद केले. कृष्ण कोण होता आणि त्याच्या लीला कशा होत्या याची माहिती त्यांनी आपल्या चित्रफिती मध्ये दाखवली.
मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये मोठी दहीहंडी बांधून बाळकृष्ण बनून आलेल्या छोट्या मुलांचे थरावर थर तयार करून जल्लोषात दहीहंडी फोडण्यात आली. प्रसाद वाटप होऊन सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्राध्यापक श्री.योगेश शिरसाट व विद्यामंदिर शाळेची विद्यार्थिनी मीरा यांनी केले.

.jpeg)

.jpeg)


0 टिप्पण्या