(राहुरी तालुका व जिल्हा प्रतिनिधी अक्षय करपे)
राहुरी येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा जिल्हा मच्छीमार सहकारी संघाचे चेअरमन शरदराव बाचकर यांनी रासपच्या आपल्या पदाचा राजीनामा
दिल्यानंतर त्यांनी कार्यकर्ता सवांद मेळाव्यात आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये खा. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थीतीत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे.
यावेळी शरदराव सबाजी बाचकर, शशिकांत मतकर, सौ.अनिताताई बागुल, संजय वाघमोडे, नारायणराव रोडे, आनंद पाटील देवकाते हे प्रमुख नेत्यांसह मोरे, कपिल लाटे, नितीन शहाणे, अशोक बाचकर, दिपक बाचकर, उत्कर्ष बाचकर,भारत हापसे, आदेश मतकर व अलकाताई पवार व असंख्य कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या विचारास प्रेरित होऊन मा खा. सुनेत्राताई पवार व पार्थ अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेश युवक नेते अक्षय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तसेच लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा घेऊन उर्वरित शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश केला जाणार असल्याचे शरद बाचकर यांनी बोलताना सांगितले. तसेच राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपा व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा जाहीर करत सर्व कार्यकर्त्यांनी शिवाजीराव कर्डिले यांना विजयी करण्यासाठी मैदानात उतरावे असे आवाहन देखील शरदराव बाचकर यांनी केले आहे.


0 टिप्पण्या