चेंबूरमध्ये प्रकाश फातर्पेकर पराभूत तुकाराम कातेंचा दणदणीत विजय
मुंबई- यंदा चेंबूर विधानसभा मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक मारण्याचा शिवसेना ठाकरे गटाच्या प्रकाश फातर्पेकर यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला.शिवसेना शिंदे गटाचे तुकाराम काते यांनी फातर्पेकर यांचा दारुण पराभव केला.
शिवसेना शिंदे गटाचे तुकाराम काते यांनी १०,७११ मतांनी शिवसेना ठाकरे गटाच्या प्रकाश फातर्पेकर यांचा पराभव केला.तुकाराम काते यांना ६३१९४ तर प्रकाश फातर्पेकर यांना ५२४८३ मते मिळाली.तुकाराम काते हे अणुशक्ती विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.काही महिन्यांपूर्वीच त्यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला होता.दहा वर्षानंतर ते पहिल्यांदाच चेंबूरमधून आमदारकी मिळविण्यासाठी आणि फातर्पेकर यांना टक्कर देण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यामुळे या लढतीकडे सर्वच चेंबूरकरांचे लक्ष वेधले होते.अखेर महायुतीतील घटक पक्षांनी त्यांना साथ देऊन प्रचार केल्याने काते यशस्वी झाले. त्यांच्या या विजयानंतर तुकाराम काते यांची संपूर्ण चेंबूर विधानसभा मतदारसंघ संघातून भव्य 'आभार रॅली ' काढण्यात आली.


0 टिप्पण्या