दिनांक १९/१०/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता सेंट्रल बँक ऑफ इंडिया, दक्षिण मुंबई प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत येणारी ऑपेरा हाऊस शाखेचा नवीन परिसर, ५-७, तळ मजला, क्विन्स डायमंड बिल्डिंग, मामा परमानंद रोड, चर्नी रोड पूर्व मुंबई ४००००४ येथे ग्राहकांसाठी खुला झाला आहे.
या नवीन परिसराचे उद्घाटन बॅंकेच्या कॉरपोरेट कार्यालयाचे कार्यकारी संचालक सन्माननीय श्री एम.वी. मुरली कृष्णा जी यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आले. त्या नंतर पारंपरिक पद्धतीने दीप प्रज्वलन केले. या समारंभाचे औचित्याने निवडक ग्राहकांना कर्ज वाटप केले त्यांनी आपल्या उद्बोधन भाषणात बँकेच्या विविध अभियानात सहभागी होऊन सफल करण्यासाठी ग्राहकांनी पुढे येऊन हातभार लावावा, असे सांगण्यात आले. आमच्या बॅंकेत ग्राहकांनी आपल्या गरजेनुसार बचत / चालू / ऋण खाते खोलावे. जुन्या ग्राहकांनी आपले खाते निष्क्रिय असेल तर ते क्रियाशील करावे, ऋण खातेधारकांनी आपले खाते एनपीए होणार नाही, याची काळजी घ्यावी. अशा विविध मुद्दयांवर प्रकाश टाकला. यानंतर विविध कर्ज योजनेच्या अंतर्गत २८० करोड रुपयांचे ऋण स्वीकृति पत्र एपेक्स ब्रास एण्ड स्टिल, कामधेनु, विनायक टींबर, नीरव मेटल, वैक्सिन फार्मा, विनायक कलेक्शन, शिवानी कोटादिया आदि ग्राहकांना प्रदान करण्यात आले.
या वेळी मुंबई अंचल प्रमुख, श्री अश्वनी धींगड़ा नी आणि प्रादेशिक प्रमुख, श्री बिरेन्द्र मेहता यांनी उपस्थित ग्राहक वर्गाला बॅंकेच्या विविध योजनांसंबंधी विस्तृत आणि महत्वपूर्ण माहिती देऊन मार्गदर्शन केले. अधिकाधिक सर्वोत्तम ग्राहक सेवा प्रदान करण्याचे आश्वासन दिले.
उपस्थित निवडक ग्राहकांनी बॅंकेसंबंधी आपआपले अनुभव - मते व्यक्त केली.
या वेळी दक्षिण मुंबई प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत येणा-या सर्व शाखांचे व्यवस्थापक, आणि प्रतिष्ठित ग्राहक वर्ग उपस्थित होता.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ऑपेरा हाऊस शाखेचे शाखा प्रमुख श्री महेश सोनी यांनी प्रस्तुत केले आणि सूत्र संचालन मुख्य व्यवस्थापकगण श्री किसन लबडे आणि सुश्री कुमारी ऋतुराज यांनी केले.

.jpeg)
.jpeg)

0 टिप्पण्या