सांघिक नृत्याने महोत्सवाची दणक्यात सुरुवात झाली. गोंधळ, जोगवा, शेतकरी नृत्य, कोळी नृत्य बघून पाहुणे प्रेक्षक भारावून गेले. सांघिक गायन, एकल वादन, एकल गायन, एकल नृत्य अश्या एकापेक्षा एक लोकनृत्याचे सदरिकरण झाले.रसिकप्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात उत्तम प्रतिसाद दिला. व कल्याण शाखेला उत्तम नियोजन करून कलावंतांना रंगमंच उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद दिले. सादरीकरण संपल्यानंतर लगेच पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून लोककलावंत श्री.संदेश विठ्ठल उमप, श्री.हेमंत यादगिरे,श्री.रवींद्र सावंत, श्री माणिक शिंदे, मान्यवर परीक्षक व बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेचे पादाधीकारी या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. कार्याध्यक्ष श्री.शिवाजी शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त व शिक्षण विभागाचे उपायुक्त व पदाधिकारी यांनी अत्रे रंगमंदिर उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
लोकलेची मराठमोळी वेशभूषा करून श्री.विकास सोनवणे यांनी निवेदनात रंगत आणली. पुरस्काराचे निवेदन श्रीमती.प्रिती बोरकर यांनी केले. नाट्य परिषदेचे सदस्य श्री.सिताराम शिंदे, श्री.दिपक देशमुख, श्री.राजाबाबू परदेशी,श्रीमती.नंदिनी कुलकर्णी, श्रीमती.दिपाली पितळे, श्रीमती.सुनंदा जाधव, श्री.विवेक कानडे, श्री.अरविंद शिंपी, श्री.श्रीरंग दाते, अभिनेता श्री.गणेश वाघमारे व श्री.मिलींद ढगे, महेश कपोस्कर, लव क्षिरसागर, संतोष कार्यक्रमाला आवर्जून उपस्थीत होते
*निकाल*
वादन
१) सर्वोत्कृष्ट - यज्ञेश अशोक बाबर
( रु.३००० , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
२) उत्कृष्ट - मल्हार जगदीश पाटील
( रु.२००० , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
३) उत्तम- नक्ष दिपक शिंदे
( रु.१००० , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
४) प्रशंसनीय- यज्ञेश भोईर
( रु.५०० , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
५) लक्षवेधी- दिक्षांत बोहरा
(प्रमाणपत्र)
एकल गायन
१) सर्वोत्कृष्ट- हर्विषा भगवान गोडे
( रु.३००० , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
२) उत्कृष्ट - हार्दिका नरेश दिनकर
( रु.२००० , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
३) उत्तम- निहीरा नरेंद्र रणभोर
( रु.१००० , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
४) प्रशंसनीय- अनन्या योगेश ढाले
( रु.५०० , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
५) प्रशंसनीय- स्वरूप वाघमारे
( रु.५०० , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
६) लक्षवेधी- क्रिशा जाधव
(प्रमाणपत्र)
एकल नृत्य
१) सर्वोत्कृष्ट- दर्शिल जयेंद्र खोले
( रु.३००० , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
२) उत्कृष्ट - ऐश्वर्या द. व्यापारी
( रु.२००० , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
३) उत्तम- भूमिका बागुल
( रु.१००० , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
४) प्रशंसनीय- त्रिशा दत्ता घनदाट
( रु.५०० , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
५) प्रशंसनीय - रिद्धी योगेश महाडिक
( रु.५०० , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
६) प्रशंसनीय - प्रचिती श्रीकांत शिंपी
( रु.५०० , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
समूह गायन
दोन प्रवेशिका असल्याने फक्त उत्कृष्ट पारितोषिक देण्यात आले.
१) उत्कृष्ट- पुराणीक प्राथमिक शाळा सुभेदार वाडा
(रु.७००० , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
समूह नृत्य
१) सर्वोत्कृष्ट- आराधना फाईन आर्टस्
( रु.११००० , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
२) उत्कृष्ट - टाईम प्रो अकॅडमी
( रु.७००० , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
३) उत्तम- बालक मंदिर प्राथमिक इंग्रजी माध्यम
( रु.५००० , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
४) प्रशंसनीय - पुरणीक प्राथमिक शाळा सुभेदार वाडा ४थी
( रु.२००० , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
५) प्रशंसनीय - तेजश्री पितळे गृप,शुभसुर क्रिएशन
( रु.२००० , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
0 टिप्पण्या