सांताक्रुझ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरा !




नुकताच रविवार सायंकाळी दि:- ११ ऑगस्ट २०२४ रोजी सांताक्रूझ येथे "स्वरसंध्या संगीत क्लासेसच्या" च्या वतीने || गुरुपौर्णिमा उत्सव || साजरा करण्यात आला होता. या निमित्ताने गुरुवर्य सुप्रसिद्ध बुवा श्री संजय मुरुडकर व कु. रुतिका संजय मुरुडकर यांच्या शिष्यांनी "गुरु पूजन" करुन, ख्याल- भजन- तबला- पखवाज सोलो वाजवून, उपस्थितांचे मने जिंकली. सुप्रसिद्ध गायिका रुतिका संजय मुरुडकर हि "संगीत विशारद प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण" होऊन, १ल्या श्रेणीत आल्याबद्दल, विशेष  सत्कार मा. खासदार विनायक राऊत साहेब यांच्या वतीने,  त्यांच्या मुलाने श्री गितेशजी राऊत सरांनी शाळ- श्रीफळ- पुष्पगुच्छ व सरस्वती मूर्ती देऊन 'सत्कार' केला. तसेच, वाकोला विभागातील नगरसेवक श्री दिनेशजी कुबल निशान घाडीगावकर शिंदे सर व मुंबई व इतर गावांतील अनेक  मान्यवरांचा, भजन सम्राट संजय बुवा यांच्या हस्ते "शाल- श्रीफळ व पुष्पगुच्छ" देऊन 'सत्कार' करण्यात आले होते. लहान छोट्या अनेक शिष्यांपैकी कु. आराध्य मुरुडकर याने ख्याल व अभंग गाऊन, विशेष दाद मिळवली. 


    या कार्यक्रमात, निमंत्रित कवी व गीतकार विलास देवळेकर तसेच, गायक व संगीतकार एकनाथ धयाळकर, बुवा श्री प्रमोद हर्याण श्री दुर्वास गुरव, श्री बंडाराज घाडगे, श्री ज्ञानेश्वर पाटील, श्री ज्ञानेश्वर कदम, श्री प्रमोद परब, श्री भगवान कदम, श्री संजय घाडी, सूत्रसंचालन श्री प्रशांत परब या सर्वांचा ही 'सत्कार' करण्यात आले. तसेच, शैनेश्वर पायी दिंडी सोहळा ब्राह्मणवाडा दिंडी क्र. २४४चे दिंडी प्रमुख ह.भ.प. कोंडिभाऊ आरोटे महाराज व त्यांचे सहकारी आले होते. आणि शेवटी, सर्व उपस्थितांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम "उत्तम व सुनियोजित" झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या