नवी मुंबई : नेरुळ येथील एसआयईएस जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स विद्यालयाचे प्राचार्य डॉ. कोयल रॉय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने नेरुळ येथील पालिकेच्या भगवान बाबा उद्यानात दिनांक २७.०७.२४ रोजी वृक्षारोपण मोहीम राबविली गेली. माजी नगरसेविका श्रीमती मीरा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या उपक्रमात सुमारे ५० विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. प्रसंगी उद्यानात पेरू, जामुन, मोगरा आदी विविध प्रकारची सुमारे ३५ झाडे लावण्यात आली. यावेळी पर्यावरणप्रेमी सुभाष हांडे देशमुख कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. प्रसंगी महाविद्यालयाच्या समन्वयक सौ. सुनिता अंभोरे, राजश्री शिंदे, सौ. राजश्री पांडे, सौ नेहा पांडे, सौ शुबलक्ष्मी थेवर, सौ. पूजा शर्मा, सौ. विधी शहा आदी शिक्षिका तसेच विजय निंबाळकर जयवंत शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाच्या समन्वयक सौ.सुनीता अंभोरे यांनी पाहुण्या श्रीमती मीरा पाटील व त्यांचे सहकारी, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले.
----------------------------------
प्रेषक:
सुभाष हांडे देशमुख
नेरुळ

.jpeg)

0 टिप्पण्या